World Cup : निवडीबाबत पंत म्हणाला, खोटं बोलणार नाही पण...

World Cup : निवडीबाबत पंत म्हणाला, खोटं बोलणार नाही पण...

भारताच्या वर्ल्ड कपच्या संघातून वगळल्यानंतर पहिल्यांदाच ऋषभ पंतने प्रतिक्रिया दिली.

  • Share this:

जयपूर, 23 एप्रिल : आयपीएलमध्ये दिल्लीचा यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतच्या तडाखेबाज खेळीच्या जोरावर राजस्थान रॉयल्सवर 6 विकेटने विजय मिळवला, पंतने 36 चेंड़ूत 78 धावा केल्या. या खेळीने दिल्लीने 192 धावांचे आव्हान सहज पूर्ण केले. या सामन्यानंतर त्याला वर्ल्ड कपच्या संघातूवन वगळल्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला.

यंदाच्या आयपीएलमध्ये पंतने फक्त दोन अर्धशतके केली आहेत. पहिलं अर्धशतक त्याने मुंबईविरुद्ध केलं होतं. त्यावेळी त्याने 27 चेंडूत 78 धावा केल्या होत्या. या दोन खेळींशिवाय पंतला चमकदार कामगिरी करता आली नाही.

पाहा VIDEO : पाँटिंग की गांगुली? धर्मसंकटात अडकलेला पृथ्वी शॉ म्हणाला...

जयपूरमध्ये सामना जिंकल्यानंतर पंतने सांगितले की, खोटं नाही बोलणार पण आता वर्ल्ड कप संघातील निवडीबद्दल काहीही मनात ठेवलेलं नाही. सध्या आयपीएलवर लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याआधी वर्ल्ड कपच्या संघात स्थान मिळेल की नाही याबद्दल सतत विचार सुरू असायचा. त्याचा परिणाम खेळावर व्हायचा. मात्र, आता असं काही डोक्यात नसून आयपीएलच्या खेळाकडे लक्ष दिलं आहे.

ऋषभ पंतने यंदाच्या आयपीएलमध्ये 11 सामने खेळले असून त्यात 336 धावा केल्या आहे. यात त्याच्या 29 चौकार आणि 16 षटकारांचा समावेश आहे. वर्ल्ड कपच्या संघात स्थान न मिळालेल्यांमध्ये अजिंक्य रहाणेसुद्धा आहे. त्याने दिल्लीविरुद्ध शतक केले मात्र त्याची खेळी व्यर्थ गेली.

VIDEO: ...म्हणून मोदी पवारांविरोधात बोलतात- रोहित पवार

First published: April 23, 2019, 1:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading