INDvsENG HighLights VIDEO : भारताचा 31 धावांनी पराभव

INDvsENG HighLights VIDEO : भारताचा 31 धावांनी पराभव

ICC Cricket World Cup इंग्लंडने भारताला पराभूत करून 27 वर्षांचा इतिहास बदलला.

  • Share this:

बर्मिंगहम, 30 जून : इंग्लंडने भारताला पराभूत करून स्पर्धेतील आव्हान जिवंत ठेवलं. बेअरस्टोचं शतक आणि बेन स्टोक्स, जेसन रॉय यांच्या अर्धशतकाच्या जोरावर इंग्लंडने 337 धावांचं आव्हान भारताला दिलं. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला 5 बाद 306 धावांपर्यंत मजल मारता आली. सलामीवीर रोहित शर्माचे शतक आणि कोहलीच्या अर्धशतकानंरही भारताचा डाव गडगडला. केएल राहुल शून्यावर बाद झाल्यानंतर रोहित आणि विराटने 138 धावांची भागिदारी केली. ख्रिस वोक्सनं ही जोडी फो़डून भारताला दुसरा दणका दिला. कोहली 66 धावांवर बाद झाला. त्यानंतर रोहित शर्मा शतक झाल्यावर लगेच बाद झाला. त्यानंतर रिषभ पंत आणि पांड्या ठराविक अंतराने बाद झाले. पंतने 32 तर पांड्याने 45 धावा केल्या. धोनी 42 आणि केदार जाधव 12 धावांवर नाबाद राहिले.

इंग्लंडकडून प्लंकेटनं सर्वाधिक 3 विकेट घेतल्या. तर ख्रिस वोक्सने 2 विकेट घेतल्या. इतर गोलंदाजांनी टिच्चून मारा करत भारताच्या फलंदाजांना जखडून ठेवलं. भारताचे पाचही फलंदाज झेलबाद झाले. इंग्लंडने विजय मिळवून वर्ल्ड कपमध्ये 1992 पासून भारताविरुद्धच्या विजयाचा दुष्काळ संपवला.

तत्पूर्वी, प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडला सलामीवीर जेसन रॉय आणि बेअरस्टो यांनी भक्कम सुरूवात करून दिली. दोघांनी 22 षटकांत 160 धावांची भागिदारी केली. त्यानंतर बेन स्टोक्स आणि जो रूट यांनी संघाच्या धावसंख्येत भर घातली. जोस बटलरने 8 चेंडूत 20 धावा केल्या. गोलंदाजीत भारताकडून एकट्या शमीने यजमानांचा निम्मा संघ तंबूत धाडला. तर बुमराह आणि कुलदीप यादवने एक बळी घेतला. शमी आणि बुमराह वगळता इतर गोलंदाजांची कामगिरी सुमार राहिली. युझवेंद्र चहल आतापर्यंत वर्ल्ड कपमधील भारताचा सर्वात महागडा गोलंदाज ठरला. त्याने 10 षटकांत तब्बल 88 धावांची खैरात केली. त्याच्याशिवाय कुलदीप यादवनेसुद्धा 72 धावा दिल्या.

SPECIAL REPORT : आंटी मत कहो ना ! चुकून म्हणालातच तर...

First Published: Jun 30, 2019 11:47 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading