World Cup : टीम इंडियाला आणखी एक धक्का, विजय शंकरला दुखापत

World Cup : टीम इंडियाला आणखी एक धक्का, विजय शंकरला दुखापत

ICC Cricket World Cup शिखर धवन दुखापतीने वर्ल्ड कपला मुकल्यानंतर आता अष्टपैलू खेळाडू विजय शंकरला सरावावेळी दुखापत झाली आहे.

  • Share this:

लंडन, 20 जून : ICC Cricket World Cup स्पर्धेत भारतीय संघाला आणखी एक धक्का बसला आहे. शिखर धवन दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेऱ झाला असताना आता अष्टपैलू विजय शंकरला दुखापत झाली आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार विजय शंकरला सरावावेळी दुखापत झाली आहे. नेटमध्ये फलंदाजी करताना जसप्रीत बुमराहचा यॉर्कर पायाला लागला.

विजय शंकरची दुखापतीबद्दल काळजी करण्याचं कारण नाही अशी माहिती मिळते. विजय शंकरला दुखापत झाली असली तरी तो बरा होईल. याआधी शिखर धवनची दुखापतसुद्धा गंभीर नव्हती असं म्हटलं जात होतं. पण नंतर त्याला वर्ल्ड कपमधून बाहेर पडावं लागलं.

विजय शंकर भारतासाठी महत्त्वाचा खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडू असलेल्या विजयने पाकिस्तानविरुद्ध गोलंदाजीत कमाल करून दाखवली होती. त्याने इमाम उल हक आणि सर्फराज अहमदची विकेट घेतली होती.

भारताच्या तीन खेळाडूंना आतापर्यंत दुखापतीने ग्रासले आहे. शिखर धवननंतर भुवनेश्वर कुमारला पायाचे स्नायू ताणल्याने मैदान सोडावं लागलं होतं. तो काही सामने खेळू शकणार नसल्याचं म्हटलं जात आहे. शिखर धवन पूर्ण स्पर्धेला मुकला असून त्याच्या जागी रिषभ पंतला संघात घेण्यात आलं आहे.

वाचा- सोनाली बेंद्रेसोबतच्या अफेअरवर शोएबचं स्पष्टीकरण, ती सुंदर पण...

वाचा-पांड्याचा खळबळजनक खुलासा, क्रिकेट आणि मुली नाही तर यात अडकला जीव

वाचा- 'तुमचा राग माझ्यावर काढू नका', वीणानंतर नेटकऱ्यांवर भडकली सानिया

VIDEO : ...तर लाज का वाटते, उद्धव ठाकरेंचा ओवेसींवर हल्लाबोल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 20, 2019 03:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading