INDIA vs West Indies Match Highlight VIDEO : भारताचा विंडीजवर 125 धावांनी विजय

INDIA vs West Indies Match Highlight VIDEO : भारताचा विंडीजवर 125 धावांनी विजय

ICC Cricket World Cup स्पर्धेतील भारताचा हा पाचवा विजय असून गुणतक्त्यात दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

  • Share this:

मँचेस्टर, 27 जून : ICC Cricket World Cupमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात आज मॅंचेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर होत असलेल्या सामन्यात भारतानं 269 धावांपर्यंत मजल मारली. भारताने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडीजचा संघ फक्त 143 धावा करू शकला. भारताने या विजयासह आपली सेमीफायनलचं तिकिट पक्कं केलं आहे.

वेस्ट इंडीज फलंदाजीला उतरताच मोहम्मद शमीने पहिला दणका दिला. शमीने दोन फलंदाजांना तंबूत धाडलं. त्यानंतर पांड्याने अॅम्ब्रिसला आणि कुलदीप यादवने निकोलस पूरनला बाद केलं. चहलने वेस्ट इंडिजचा कर्णधार जेसन होल्डर युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर बाद झाला. बुमराहने ब्रेथवेट आणि अॅलनला सलग दोन चेंडूवर बाद केले. त्यानंतर शमीने आणि चहलने एक विकेट घेत विंडीजचा डाव संपुष्टात आणला.

तत्पूर्वी, सामन्यात भारतानं प्रथम टॉस जिंकत फलंदाजीचा निर्णय घेतला. यात विराट कोहलीने 72 धावांची तर, धोनीनं अर्धशतकी खेळी केली. मात्र आघाडीच्या फलंदाजांना चांगली फलंदाजी करता आली नाही. रोहित शर्मा 18 धावांवर बाद झाला. भारतीय संघाची भिस्त विराट कोहली आणि केएल राहुल यांच्यावर असतानाच राहुल 48 धावांवर बाद झाला. हार्दिक पांड्याच्या 46 धावांच्या खेळीच्या जोरावर भारतानं 268 धावांपर्यंत मजल मारली.

World Cup : भारतासमोर चौथ्या क्रमांकाचा पेच, रिषभ पंतला संधी द्यावी?

टीम इंडियाच्या भगव्या जर्सीची राजकीय बॅटिंग

First published: June 27, 2019, 10:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading