द्रविडमुळे मयंक अग्रवालची निवड, रहाणे-रायडुला टाकलं मागे!

द्रविडमुळे मयंक अग्रवालची निवड, रहाणे-रायडुला टाकलं मागे!

ICC Cricket World Cup एकही वनडे सामना न खेळलेल्या मयंकची विजय शंकरच्या जागी निवड झाली.

  • Share this:

बर्मिंगहम, 02 जुलै : ICC Cricket World Cup भारताने दुखापतग्रस्त विजय शंकरच्या जागी मयंक अग्रवालला संधी दिली आहे. शंकर दुखापतीने स्पर्धेत खेळू शकणार नाही. त्याच्याऐवजी कर्नाटकच्या मयंक अग्रवालची वर्णी लागली. मयंकने अजिंक्य रहाणे आणि अंबाती रायडु यांसारखे खेळाडू भारताकडे असताना बाजी मारली. त्याने गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. रहाणे आणि रायडु यांच्या नावांची चर्चा असतानासुद्धा इंडिया ए कडून खेळताना केलेल्या कामगिरीच्या जोरावर मयंक अग्रवालची निवड झाली.

मयंकने इंडिया ए कडून खेळताना 4 सामन्यात 287 धावा केल्या होत्या. तर रहाणेची फिरकीपटूंविरुद्धची कामगिरी आणि रायडुचा फॉर्म यामुळे दोघेही मागे पडले.

दरम्यान, मयंकच्या निवडीमागे इंग्लंडमधील मालिकेत केलेली कामगिरी तर वरचढ ठरलीच. त्याचबरोबर भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडने केलेलं कौतुक त्याच्या निवडीत महत्त्वाचं ठरलं अशी माहीती मिळते. अजिंक्य रहाणे मधल्या षटकांत खेळताना अडखळतो. तसेच फिरकीपटूंना सामोरं जाणं अजिंक्य रहाणेला अवघड जातं. तर अंबाती रायडुच्या कामगिरीत सातत्य नसल्यानं त्याचं नाव पुढे येऊ शकलं नाही.

देशांतर्गत क्रिकेट खेळताना मयंक अग्रवालने जबरदस्त प्रदर्शन केलं आहे. मयंकने 75 प्रथम श्रेणी सामने खेळताना 14 अर्धशतके आणि 12 शतके केली आहे. त्याने 48 च्या सरासरीने 3 हजार 605 धावा केल्या आहेत. इंग्लंडमधील त्याची कामगिरी चांगली असून 3 शतकांसह 442 धावा केल्या आहेत. आयपीएलमध्येही चमक दाखवताना त्याने 13 सामन्यात 141 च्या स्ट्राइक रेटनं 332 धावा केल्या आहेत.

World Cup : धोनीवर भडकले दिग्गज, विराटने केली पाठराखण!

World Cup : भारताच्या पराभवाला या 11 गोष्टी ठरल्या कारणीभूत!

'तुम्हाला ऋषभ पंत हवा होता ना, घ्या मग'; रोहितनं केली बोलती बंद

World Cup : सेमीफायनलचा गुंता वाढला, भारतही होऊ शकतो वर्ल्ड कपच्या बाहेर

VIRAL FACT: सरकारने वारकऱ्यांना साडेपाच लाख रेनकोट वाटले का?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 2, 2019 10:51 AM IST

ताज्या बातम्या