World Cup : भारत सर्वात महागडा संघ, इतकी आहे किंमत

World Cup : भारत सर्वात महागडा संघ, इतकी आहे किंमत

विजय शंकर बीसीसीआयच्या करारात नसलेला पण वर्ल्ड कप संघात असलेला एकमेव खेळाडू आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 एप्रिल : इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा सोमवारी करण्यात आली. या स्पर्धेत सहभागी होणारा भारतीय संघ हा इतर देशांच्या तुलनेत सर्वात महागडा असणार आहे. भारताच्या संघाची एकूण किंमत 194 कोटी इतकी आहे.

निवड समितीने म्हटले होते की आयपीएलमधील कामगिरी पाहून कोणत्याच खेळाडूला वर्ल्ड कपसाठी विचारात घेतले जाणार नाही. सध्या आयपीएलमध्ये खेळणाऱ्या 8 पैकी 7 संघातील खेळाडू वर्ल्ड कपच्या संघात आहेत. फक्त राजस्थान रॉयल्समध्ये खेळणारा एकही खेळाडू जागा मिळवू शकला नाही.

भारतीय संघातील खेळाडूंना बीसीसीआयसोबतचा केंद्रीय करार आणि आयपीएलच्या लिलावातून मिळणाऱी रक्कम एकत्रित केली तर 15 खेळाडूंची किंमत 193.7 कोटी रुपये इतकी होते. यात विजय शंकर असा खेळाडू आहे ज्याचा कोणताही केंद्रीय करार नाही.

World Cup : इंग्लंडच्या संघात KKR चा खेळाडू इन तर राजस्थानचा आऊट

बीसीसीआयसोबतच्या करारात या 15 भारतीय खेळाडूंना वर्षाला एकूण 62 कोटी रुपये मिळतात. यात विराट, रोहित आणि बुमराहला प्रत्येकी 7 कोटी तर धोनी, धवन, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, जडेजा, कुलदीप यादवला प्रत्येकी पाच कोटी रुपये मिळतात. लोकेश राहुल, युझवेंद्र चहल आणि हार्दिक पांड्या तीन कोटींच्या ग्रेडमध्ये तर केदार जाधव आणि दिनेश कार्तिक यांना वार्षिक एक कोटी रुपये मिळतात.

वाचा - World Cup : भारतीय संघातले 'हे' हिरो शाळेत मात्र झिरो

आयपीएलमध्ये विराट सर्वात महागडा खेळाडू आहे. त्याला 17 कोटी रुपयांना बेंगळुरूने घेतले आहे. तर रोहित आणि धोनीची किंमत प्रत्येकी 15 कोटी रुपये आहे. केएल राहुल आणि हार्दिक पांड्याला 11 कोटी तर भुवनेश्वर कुमारला साडे आठ कोटी रुपयांना खरेदी केलं आहे. त्याखालोखाल केदार जाधव 7.80 कोटी, कार्तिक 7.40 कोटी तर जडेजा आणि बुमराहला प्रत्येकी 7 कोटी रुपये मोजले आहेत. युझवेंद्र चहलला आरसीबीने 6 कोटी रुपये मोजून संघात घेतले आहे. कुलदीप यादव 5.80 कोटी, शिखर धवन 5.20 कोटी, शमी 4.80 कोटी तर विजय शंकरला 3.20 कोटी किंमत लिलावात मिळाली आहे.

...तर पंत, रायडु आणि सैनीला वर्ल्डकपमध्ये खेळण्याची संधी

वर्ल्ड कपमध्ये खेळणाऱ्या खेळाडूंची आयपीएलमधील किंमत एकूण 131.70 कोटी होते. यात बीसीसीआयच्या करारातील रक्कम धरल्यास ती किंमत 193 कोटी 70 लाख इतकी होते.

वर्ल्डकपच्या संघात चेन्नईकडून खेळणारे धोनी, जडेजा आणि केदार जाधव तर मुंबई इंडियन्सचे रोहित, बुमराह आणि हार्दिक पांड्या हे तिघेजण आहेत. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळाणाऱे केएल राहुल, मोहम्मद शमी, केकेआरचे कुलदीप यादव आणि दिनेश कार्तिक, आरसीबीचे विराट आणि युझवेंद्र चहल, हैदराबादचे भुवनेश्वर कुमार आणि विजय शंकर आणि दिल्लीचा शिखऱ धवन यांचा वर्ल्ड कपच्या संघात समावेश आहे.

...तर बरं झालं असतं, पंतप्रधान मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल, पाहा VIDEO

First published: April 17, 2019, 7:01 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading