सेहवागच्या सल्ल्यानंतर 40 वर्षांचा खेळाडू झाला 'यंग', गाजवणार वर्ल्ड कप

सेहवागच्या सल्ल्यानंतर 40 वर्षांचा खेळाडू झाला 'यंग', गाजवणार वर्ल्ड कप

वर्ल्ड कप स्पर्धेत हा खेळाडू भारतासह इतर संघांसाठी धोकादायक ठरू शकतो. या खेळाडूचं करिअर संपुष्टात आलं होतं त्यावेळी सेहवागने त्याला सल्ला दिल्यानंतर पुन्हा खेळ सुधारला.

  • Share this:

मुंबई, 16 मे : इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेकडं आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. आयपीएल गाजवल्यानंतर वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज ख्रिस गेल आता वर्ल्ड कपच्या स्पर्धेसाठी तयार आहे. हा त्याचा शेवटचा वर्ल्ड कप असेल. यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारणार असल्याचे आधीच जाहीर केलं आहे.

ख्रिस गेलचे वय 39 वर्षे असून फिटनेससाठी जिममध्ये घाम गाळण्यापेक्षा योगा आणि मसाज याला प्राधान्य देतो. क्रिकेट खेळल्याने, सरावानंतर आलेला थकवा घालवण्यासाठी तो योगाभ्यास करतो. तसेच दोन सामन्यांच्या दरम्यान मिळालेल्या वेळेत पुरेशी विश्रांतीही घेतो.

गेलच्या या योगाभ्यास आणि मसाजच्या मागे भारताचा माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग आहे. गेल्या वर्षी सेहवागने गेलची योगा शिक्षकाची आणि मसाज करणाऱ्याची भेट घडवून आणली होती. त्यांच्याकडून प्रशिक्षण घेतल्यानंतर गेलच्या कामगिरीत बरीच सुधारणा झाली.

2018 च्या आयपीएल हंगामात किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळताना दुसऱ्याच सामन्यात गेलने शतक केले होते. तेव्हा त्याच्या फॉर्मवरून बरीच टीका केली जात होती. किंग्ज इलेव्हन पंजाबकडून खेळणाऱ्य़ा गेलच्या मनात त्यावेळी सल्लागार असलेल्या विरेंद्र सेहवागने त्याला पुनरागमनाचा आणि चांगल्या खेळीचा विश्वास निर्माण केला. याबद्दल शतकानंतर बोलताना गेलने विरेंद्र सेहवागचे आभारही मानले होते.

क्रिकेटमधून निवृत्ती घेणार असल्याचं जाहीर केल्यानंतर अलिकडच्या काळात पुन्हा फलंदाजीत सूर गवसल्याचं गेलनं म्हटलं आहे. आताच्या खेळाने मी समाधानी असून अनुभवाचा वर्ल्ड कपमध्ये नक्कीच फायदा होईल असेही त्याने सांगितलं. फटकेबाजी करणारा गेल समोर असला की भल्या भल्या गोलंदाजांच्या उरात धडकी भरते. इंग्लंडविरुद्ध चार सामन्यात त्याने 39 षटकार मारले तर आयपीएलमध्ये 34 षटकार मारले आहेत. वयाचा कामगिरीवर कोणताही परिणाम जाणवत नाही असंही गेलंने म्हटलं आहे.

गेल म्हणतो की, वय वाढतच राहील पण खेळात शारीरिक नाही तर मानसिक ताकद अनेकदा महत्त्वाची ठरते. मन प्रफुल्लीत ठेवण्याचा सतत प्रयत्न करतो. मैदानावर जाण्यापूर्वी तंदुरुस्तीसाठी काय हवं याचा विचार करतो. अखेरचा वर्ल्ड कप आठवणीत राहणारा असावा अशी इच्छा असल्याचे गेल म्हणाला. चाहत्यांच्या प्रेमामुळेच निवृत्ती आतापर्यंत पुढे ढकलल्याचंही गेलनं सांगितलं.

वाचा : रक्तबंबाळ होऊनही खेळलेल्या वॉटसनचा हा VIDEO पाहुन तुम्हीही व्हाल भावुक

VIDEO: जनता होरपळतेय दुष्काळात, मंत्री सदाभाऊ खोत ACच्या गार वाऱ्यात!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 16, 2019 11:53 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading