धवन बायकोला म्हणतो, शांत हो! इतकं तर प्रशिक्षकही माझ्यावर रागवत नाहीत

शिखर धवनने एका मुलाखतीत बायकोबद्दल सांगताना तिने कठीण काळात खंबीर साथ दिल्याचे म्हटलं.

News18 Lokmat | Updated On: May 17, 2019 01:23 PM IST

धवन बायकोला म्हणतो, शांत हो! इतकं तर प्रशिक्षकही माझ्यावर रागवत नाहीत

भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवनने आयपीएलमध्ये 16 सामन्यात 521 धावा केल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेला धवन आता वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघााल दमदार सुरुवात करण्यासाठी सज्ज आहेत. शिखऱ धवन त्याच्या बिनधास्त आणि मजेशीर स्वभावासाठी ओळखला जातो.

मैदानावर सहज वावरणाऱ्या या खेळाडूच्या स्वभावाचा कधी कधी चुकीचा अर्थही काढला जातो. त्याच्यावर पोरकटपणाचा आरोप करत गंभीर नसल्याचं म्हटलं जातं. धवननेसुद्धा आपल्याला शांत रहायला आवडतं आणि मला माहिती आहे जास्त उत्साहीपणा चांगला नसतो असं म्हटलं आहे.

धवनने एका मुलाखतीत आपण अचानक शाकाहारी होण्याचा निर्णय घेतल्याचंही सांगितलं.  तंदुरुस्तीसाठी शाकाहारी झालेलो नसून नकारात्मकता कमी करण्यासाठी हा निर्णय घेतला असं धवन म्हणाला.

Loading...

मांसाहार करण्याने नकारात्मकता वाढते असं वाटत होतं. या कारणामुळे तीन महिन्यापूर्वी शाकाहारी झाल्याचं धवनने सांगितलं. पंजाबी असलेल्या धवनला मांसाहार ही नेहमीची बाब आहे.

शिखर धवन म्हणाला की, कामगिरीवरून गेल्या काही महिन्यांमध्ये टीका माझ्यावर केली जात होती.  त्यावेळी पत्नीने खंबीर साथ दिली. क्रिकेटबद्दल तिच्याशी चर्चा करताना ती कधी कधी माझ्या वाईट कामगिरीवर इतकी रागावते की शेवटी तिला सांगावं लागतं. शांत हो, एवढं तर माझे प्रशिक्षकही माझ्यावर रागवत नाहीत

वर्ल्ड कपच्या भारतीय संघात सलामीला खेळताना दबाव असेल का याबद्दल सांगताना धवन म्हणाला की, मी दबाव घेणार नाही, जितका विचार खेळाबद्दल करेन तेवढं माझ्यासाठी धोकादायक असेल. त्यामुळे मी शांत राहण्याचा प्रयत्न करेन.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 17, 2019 01:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...