मुंबई, 21 मे : विश्वचषकासाठी आता केवळ नऊ दिवसांचा कालावधी उरला असताना, सध्या सर्व संघ जय्यत तयारी करित आहे. दरम्यान भारतीय संघ आज इंग्लंडसाठी रवाना झाला. दरम्यान याआधी कर्णधार विराट कोहली आणि मुख्य कोच रवी शास्त्री यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी इंग्लंडमधील होणाऱ्या बाराव्या विश्वचषकात सीमेवरील भारतीय लष्करासाठी झुंजणार असल्याचे भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
बाराव्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय क्रिकेट संघ आज रात्री लंडनला रवाना होत आहे. त्यापूर्वी भारतीय क्रिकेट नियामक नियामक मंडळाच्या मुख्यालयात कोहलीने पत्रकार परिषदेत आपला विजयी निर्धार प्रकट केला. भारतीय संघाने सैनिकांसाठी खेळावे या मोहिंदर अमरनाथ केलेल्या आवाहानाला कर्णधार विराटने प्रतिसाद देत, ''देशासाठी लढणाऱ्या सैनिकांसाठी आम्ही इंग्लंडमध्ये जिंकण्यासाठी सज्ज झालो आहोत'', असे सांगितले. तर, हाय होल्टेज पाकिस्तान विरुद्ध लढतीसाठी काय रणनिती असेल या प्रश्नावर उत्तर देताना विराट म्हणाला की एकट्या पाकिस्तानसाठी आम्ही खेळणार नाही. प्रत्येक सामना आमच्यासाठी महत्वाचा आहे. पहिल्या चेंडूपासून आम्ही जिंकू किंवा मरू यासाठीच खेळताना दिसेल'', असेही तो म्हणाला.
भारतीय संघात कोणतेही बदल नाहीत
15 खेळाडूंच्या चमुत सामील केलेल्या खेळाडूंमुळं अनेक वाद झाले. दरम्यान त्यानंतर आयपीएलमुळं अनेक खेळाडूंना दुखापतींना सामोरे जावे लागले होते. यात केदार जाधवचा समावेश होता. त्यामुळं विश्वचषकाच्या संभाव्य संघात सामिल झालेला केदार जाधव विश्वचषक खेळणार की नाही, याबाबत साशंकता होती. त्यामुळं संभाव्य संघात बदल अपेक्षित होते, परंतु केदार पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याची घोषणा निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी केली. त्यामुळे त्याच्या जागी ऋषभ पंतला किंवा अन्य कुणालाही संधी मिळण्याची शक्यताही विरली आहे.
‘कुल्चा’ची जोडी हिटचं
पत्रकार परिषदेत विराट कोहलीनं कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहल यांच्या जोडीवर महत्त्वाचं योगदानं दिलं. कोहली म्हणाला की, “ हे दोन्ही फिरकीपटू भारतासाठी महत्त्वाचे आहेत. कुलदीपकरिता आयपीएल चांगलं ठरलं नसलं तरी, तो विश्वचषकात नक्कीच चांगली कामगिरी करेल’’, असे मत व्यक्त केले.
धोनी संघाची मुख्य ताकद
गेल्या काही दिवसांपासून महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा होती. दरम्यान यावर विराट कोहलीनं धोनीची बाजू घेत, धोनी भारतासाठी महत्त्वाचा आहे, असे सांगितले. तर, शास्त्री यांनी, “धोनी संघासाठी खुप महत्त्वाचा आहे. त्याचा अनुभव भारताला विश्वचषकात खुप पुढे घेऊन जाईल. खेळाडू म्हणून तो काय आहे, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. रन आऊट, स्टम्पिंग यासाठी तर त्याची चपळता आपण पाहिलीच आहे. त्यामुळं धोनीवर खुप मोठी जबाबदारी असणार आहे’’, असे सांगितले.
2019 च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक
वाचा- IPL मधील 'हा' महागडा खेळाडू ऐनवेळी इंग्लंडच्या संघात
वाचा- 106 कर्णधार तोडू शकले नाहीत 'दादा'चा विक्रम, विराटला संधी!
वाचा- सत्य कटू असतं, पाकच्या खेळाडूने केला असा निषेध
VIDEO : वर्ल्डकपसाठी काय आहे टीमचा प्लॅन? विराट कोहलीची UNCUT पत्रकार परिषद
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.