World Cup : वर्ल्ड कपमध्ये विराटला सतावत आहे ‘ही’ भीती

World Cup : वर्ल्ड कपमध्ये विराटला सतावत आहे ‘ही’ भीती

भारतीय संघ 22 तारखेला इंग्लंडसाठी रवाना होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 21 मे : विश्वचषकासाठी आता केवळ नऊ दिवसांचा कालावधी उरला असताना, सध्या सर्व संघ जय्यत तयारी करित आहे. दरम्यान भारतीय संघ आज इंग्लंडसाठी रवाना झाला. दरम्यान याआधी कर्णधार विराट कोहली आणि मुख्य कोच रवी शास्त्री यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी विराटनं यंदाचा भारतीय संघ हा सर्वोत्तम संघ असून आम्हाला चॅम्पियन बनवण्यापासून कोणीही थांबू शकत नाही, अशी कबुली दिली. तसेच, ‘’प्रत्येक खेळाडूचं योगदान महत्त्वाचं आहे, दडपण नसले तरी आम्ही तयार आहोत’’, असे विराट म्हणाला.

इंग्लंड आणि वेल्स येथे 30 मे पासून विश्वचषक सुरु होणार असला तरी, भारतीय संघाची पहिली लढत 5 जून रोजी होणार आहे. दरम्यान, विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ हा विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे. इंग्लंडला पोहचल्यानंतर मुख्य स्पर्धेपूर्वी भारतीय संघ न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्याशी सराव सामना खेळणार आहे.

दरम्यान यंदाच्या विश्वचषकात 1992नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धा राऊंड रॉबीन फॉरमॅटमध्ये खेळवण्यात येणार आहे. यामुळे टॉपच्या संघांसाठी ही धोक्याची घंटा असण्याची शक्यता आहे. राउंड रॉबिन आणि नॉकआउट पद्धतीने स्पर्धेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक संघाची एकमेकांशी लढत होते. यात कोणत्याही संघाला कमी किंवा जास्त करता येत नाही. प्रत्येक संघाला त्यांची ताकद अजमावण्याची संधी मिळते. भारत, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, पाकिस्तान या संघांना दावेदार मानलं जात आहे. मात्र, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघही टॉप 4 मध्ये पोहचू शकतात.

त्यामुळं विराटला सध्या ही गोष्ट सर्वात जास्त सतावत आहे. स्पर्धांपेक्षा हा बदल अधिक आव्हानात्मक असल्याचे कोहलीला वाटते. याविषयी विराट म्हणाला की, ''या नव्या फॉरमॅटमुळं वर्ल्ड कपमधील चुरस अधिक वाढवली आहे. त्यामुळे ही स्पर्धा अधिक आव्हानात्मक झाली आहे. 2015नंतर अफगाणिस्तान सारख्या संघानेही बरीच प्रगती केली आहे. त्यामुळे कोणत्याही संघाला कमी लेखून चालणार नाही. त्यामुळे या स्पर्धेत खेळपट्ट्या कशा आहेत यापेक्षा तणाव कसा हाताळतो, हे महत्त्वाचे आहे.''.

असे असतील भारताचे सामने

Loading...

5 जून : भारत विरुद्ध साऊथ आफ्रिका (दु. 3 वाजता)

9 जून : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिय (दु. 3 वाजता)

13 जून : भारत विरुद्ध न्युझीलॅंड (दु. 3 वाजता)

16 जून : भारत विरुद्ध पाकिस्तान (दु. 3 वाजता)

22 जून : भारत विरुद्ध अफगाणिस्तान (दु. 3 वाजता)

27 जून : भारत विरुद्ध वेस्ट इंडिज (दु. 3 वाजता)

30 जून : भारत विरुद्ध इंग्लंड (दु. 3 वाजता)

2 जुलै : भारत विरुद्ध बांगलादेश (दु. 3 वाजता)

6 जुलै : भारत विरुद्ध श्रीलंका (दु. 3 वाजता)

2019 च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक.

वाचा- World Cup : 1 ट्रॉफी, 46 दिवस, 10 संघ...या दिवशी असतील भारताचे सामने

वाचा- World Cup : 'फक्त भारतीय लष्करासाठी आम्ही वर्ल्ड कपमध्ये लढणार'

वाचा- World Cup : 'या' खेळाडूंनी मिळवून दिला वर्ल्ड चॅम्पियनचा ताज, त्यांनाच विराटकडून डच्चू

वाचा- World Cup : '...तर आम्हाला चॅम्पियन होण्यापासून कोणीही थांबू शकत नाही'

वाचा- World Cup : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, भारतीय संघात कोणतेही बदल नाहीत


VIDEO : वर्ल्डकपसाठी काय आहे टीमचा प्लॅन? विराट कोहलीची UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 07:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...