WORLD CUP : ...तर सेमीफायनल न खेळताच भारत थेट फायनलमध्ये धडक देणार

WORLD CUP : ...तर सेमीफायनल न खेळताच भारत थेट फायनलमध्ये धडक देणार

वर्ल्ड कपमधील साखळी सामन्यांत दमदार कामगिरी करत भारतीय संघानं गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे.

  • Share this:

मँचेस्टर, 08 जुलै : इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या ICC Cricket World Cup मध्ये लवकरच सेमीफायनलचा थरार रंगणार आहे. सेमीफायनलचा पहिला सामना 9 जुलै रोजी भारत आणि न्यूझीलंड (ind vs nz) या संघामध्ये होणार आहे. या सामन्यात भारताचं पारडं जड असल्याचं मत तज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे. अशातच भारतासाठी आणखी एक खूशखबर मिळाली आहे.

वर्ल्ड कपमधील साखळी सामन्यांत दमदार कामगिरी करत भारतीय संघानं गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलं आहे. त्यामुळे सेमीफायनलमध्ये भारताचा मुकाबला चौथ्या स्थानी असलेल्या न्यूझीलंडच्या संघाविरुद्ध रंगणार आहे. पण 9 जुलै रोजी होणाऱ्या या सामन्यावर पावसाचं सावट असल्याचं पाहायला मिळत आहे. पावसामुळे हा सामना रद्द झाल्यास ICC कडून सेमीफायनलच्या मुकाबल्यासाठी आणखी एका अतिरिक्त दिवसाची तरतूद करण्यात आली आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड हा 9 जुलैचा सामना रद्द झाल्यास हा सामना 10 जुलैला खेळवण्यात येणार आहे. पण इंग्लंडमधील हवामानाच्या अंदाजानुसार या दोन्ही दिवशी ज्या मैदानावर हा सामना खेळवण्यात येणार तिथं ढगाळ वातावरण राहणार असून सामन्यावर पावसाचं सावट आहे.

अशा स्थितीत जर सेमीफायनलचा सामना रद्द झाल्यास पुढे काय? असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला असेल. पण सामना रद्द होणं भारताच्याच पथ्यावर पडणार आहे. कारण गुणतालिकेत न्यूझीलंडचे 11 गुण असून भारताचे सर्वाधिक 15 गुण आहेत. त्यामुळे भारताला फायदा होणार असून सेमीफायनल रद्द झाल्यास थेट फायनलचं तिकीट मिळणार आहे.

दरम्यान, भारताच्या संघात सेमीफायनमध्ये कोणाला स्थान द्यायचं याबद्दल माजी कर्णधार सौरव गांगुलीने त्याचं मत मांडलं आहे. भारतीय संघात दिनेश कार्तिक आणि भुवनेश्वर कुमार यांच्याऐवदी केदार जाधव आणि मोहम्मद शमीला संधी द्यावी असा सल्ला गांगुलीने विराटला दिला आहे. तसेच कार्तिकला सातव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी घेण्यापेक्षा केदार जाधवला संधी दिल्यास सहावा गोलंदाज म्हणून तो उपयुक्त ठरू शकतो. याशिवाय जडेजाही संघात असल्याने भारताकडे फलंदाजांची कुमक शेवटपर्यंत उपलब्ध राहिल असं गांगुलीने म्हटलं आहे.

सिनेमा पाहून बँकेत दरोडा, चोरट्यांचा राडा CCTVमध्ये कैद

First published: July 8, 2019, 10:11 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading