News18 Lokmat

World Cup : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, भारतीय संघात कोणतेही बदल नाहीत

भारतीय संघ 22 तारखेला इंग्लंडसाठी रवाना होणार आहे.

News18 Lokmat | Updated On: May 21, 2019 04:43 PM IST

World Cup : पुणेकरांसाठी आनंदाची बातमी, भारतीय संघात कोणतेही बदल नाहीत

मुंबई, 21 मे : विश्वचषकासाठी आता केवळ नऊ दिवसांचा कालावधी उरला असताना, सध्या सर्व संघ जय्यत तयारी करित आहे. दरम्यान भारतीय संघ आज इंग्लंडसाठी रवाना झाला. याआधी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने विश्वचषक स्पर्धेसाठी जाहीर केलेल्या 15 जणांच्या संघात कोणतेही बदल केले जाणार नाही असे स्पष्ट केले आहे. त्यामुळं पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे. कारण पुण्याचा एक खेळाडू प्रथमच विश्वचषक खेळणार आहे.

15 खेळाडूंच्या चमुत सामील केलेल्या खेळाडूंमुळं अनेक वाद झाले. दरम्यान त्यानंतर आयपीएलमुळं अनेक खेळाडूंना दुखापतींना सामोरे जावे लागले होते. यात केदार जाधवचा समावेश होता. त्यामुळं विश्वचषकाच्या संभाव्य संघात सामिल झालेला केदार जाधव विश्वचषक खेळणार की नाही, याबाबत साशंकता होती. त्यामुळं संभाव्य संघात बदल अपेक्षित होते, परंतु केदार पूर्णपणे तंदुरुस्त झाल्याची घोषणा निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी केली. त्यामुळे त्याच्या जागी ऋषभ पंतला किंवा अन्य कुणालाही संधी मिळण्याची शक्यताही विरली आहे. 30 मे पासून वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे, परंतु भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

आयपीएलमध्ये चेन्नईकडून खेळणाऱ्या केदारला पायाच्या पेशी ताणल्या गेल्यानं विश्रांती घ्यावी लागली होती. त्यामुळं बाद फेरीपूर्वीच त्यानं स्पर्धेतून माघार घ्यावी लागली होती. त्यानंतर संघाचे फिजीओ पॅट्रीक फरहार्ट यांच्या मार्गदर्शनाखाली केदार आपल्या तंदुरुस्तीकडे विशेष लक्ष देत होता. दरम्यान आज पत्रकारांशी बोलताना, निवड समितीचे प्रमुख प्रसाद यांनी, ''केदार जाधव विश्वचषक स्पर्धा खेळण्यासाठी तंदुरुस्त असल्याचा वैद्यकीय अहवाल आम्हाला देण्यात आला आहे. त्यामुळे बुधवारी तो संघासोबत लंडनला रवाना होईल,'' अशी माहिती दिली. केदारने 59 वन डे सामन्यांत 43.48च्या सरासरीने 1174 धावा केल्या आहेत. शिवाय त्याच्या नावावर 27 विकेट्सही आहेत. भारतीय संघ 22 तारखेला इंग्लंडसाठी रवाना होणार आहे. केदारला तंदुरुस्त करण्यासाठी फरहार्ट ऑस्ट्रेलियाहून लवकर परतला. केदारच्या समावेशामुळे भारताच्या मधल्या फळीची चिंता मिटली आहे.

2019 च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक.

वाचा- IPL मधील 'हा' महागडा खेळाडू ऐनवेळी इंग्लंडच्या संघात

Loading...

वाचा- 106 कर्णधार तोडू शकले नाहीत 'दादा'चा विक्रम, विराटला संधी!

वाचा- सत्य कटू असतं, पाकच्या खेळाडूने केला असा निषेध


VIDEO : वर्ल्डकपसाठी काय आहे टीमचा प्लॅन? विराट कोहलीची UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 21, 2019 04:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...