गांगुली, द्रविड आणि सेहवागला जमलं नाही ते धोनी करणार

धोनीला आतापर्यंत वर्ल्ड कपमध्ये एकही शतक झळकावता आलेलं नाही.

  • Share this:

इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपसाठी विराटसेना सज्ज झाली आहे. यावेळी भारताला टी20 आणि एकदिवसीय असे दोन्ही वर्ल्ड कप मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंग धोनीची विराटला मदत होणार आहे. धोनीचा हा चौथा वर्ल्ड कप असणार आहे.

धोनीने 2007 ला पहिला वर्ल्ड कप खेळला होता. त्यानंतर 2011 ला त्याच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कप जिंकला. गेल्या तीन वर्ल्ड कपमध्ये धोनीने 20 सामन्यात 507 धावा केल्या आहेत. तर नाबाद 91 धावा ही त्याची वर्ल्ड कपमधील सर्वोच्च कामगिरी आहे.

वर्ल्ड कपमध्ये धोनीची तीन अर्धशतकं झाली आहेत. त्याला आतापर्यंत एकही शतक साजरं करता आलेलं नाही, या वर्ल्ड कपमध्ये त्याला ही संधी आहे.

सर्वाधिक वर्ल्ड कप खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. त्याने 6 वर्ल्ड कपमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केलं आहे. तर धोनी चार वर्ल्ड कप खेळणारा भारताचा 5 वा खेळाडू ठरणार आहे. याआधी जवागल श्रीनाथ, मोहम्मद अझरुद्दीन आणि कपिल देव यांनी 4 वर्ल्ड कप खेळले आहेत.

सचिनशिवाय पाकिस्तानच्या जावेद मियाँदादने 6 वर्ल्ड कप खेळले आहेत. त्याने 1975 ते 1996 पर्यंत पाकिस्तानकडून वर्ल्ड कपमध्ये प्रतिनिधीत्व केले.

भारताच्या सौरव गांगुली, राहुल द्रविड, विरेंद्र सेहवाग यांनी 3 वर्ल्ड कप खेळले आहेत. सौरव गांगुली, राहुल द्रविड यांनी 1999, 2003 आणि 2007 च्या वर्ल्ड कपमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व केलं आहे. तर विरेंद्र सेहवाग 2003 ते 2011 दरम्यान तीन वर्ल्ड कप खेळला आहे. या तिघांना मागे टाकून धोनी चौथा वर्ल्ड कप खेळणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 12:43 PM IST

ताज्या बातम्या