VIDEO : 'मैदान-ए-जंग'मध्ये भारतानं नेहमीच दाखवले पाकला आसमंत, पाहा 'हा' World Cup Flashback

VIDEO : 'मैदान-ए-जंग'मध्ये भारतानं नेहमीच दाखवले पाकला आसमंत, पाहा 'हा' World Cup Flashback

विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जूनला हाय-वोल्टेज सामना होणार आहे.

  • Share this:

वेल्स, 20 मे : वर्ल्ड कप सुरु होण्याकरिता आता केवळ 10 दिवसांचा कालावधी उरला आहे. त्यामुळं सर्व संघांनी जय्यत तयारी सुरु केली आहे. 30मे पासून क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या इंग्लंड आणि वेल्स येथे सुरु होणाऱ्या वर्ल्ड कपमध्या सगळ्यांचे लक्ष लागले आहे ते, भारत आणि पाकिस्तान यांच्या सामन्यात. विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 16 जूनला हाय-वोल्टेज सामना होणार आहे. भारत आणि पाकिस्तान हे एकूण 6 वेळा विश्वचषकात एकमेकांसमोर येऊन उभे ठाकले आहे, आणि सहाही वेळा भारतानं पाकिस्तानला नमवलं. दरम्यान आतापर्यंत भारतानं दोन वेळा (1983, 2011) तर पाकिस्तानंन एकदा (1992)ला विश्वचषक जिंकण्याचा मान मिळवला आहे. मात्र, भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हे पाच सामने सर्वांच्या कायमच लक्षात राहणार ठरले.

1. 1992 वर्ल्ड कप (सिडनी)

भारत : 216/7

पाकिस्तान : 172

मॅन ऑफ द मॅच : सचिन तेंडुलकर

Loading...


भारत आणि पाकिस्तान यांच्यात विश्वचषकातला सर्वात पहिला सामना झाला तो, 1992मध्ये. या सामन्यात पाकिस्तानचा जावेद मियादाद आणि भारताचा यष्टीरक्षक किरण मोरे यांच्यातला वाद आपण सगळे जाणतोच. या सामन्यात आक्रमक फलंदाजी केली ती सचिन तेंडुलकर या युवा फलंदाजानं. सचिननं या सामन्यात नाबाद 54 धावा केल्या होत्या. भारतानं प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानसमोर 216 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ केवळ 172 धावांत गारद झाला. यात किरण मोरे यांनी घेतलेले दोन झेल आणि इमरान खान यांना केलेले ऐतिहासिक रनआऊट यांनी महत्त्वाची भुमिका बजावली.

2. 1996 वर्ल्ड कप (बंगळुरू)

भारत : 287/8

पाकिस्तान : 248/9

मॅन ऑफ द मॅच : नवज्योत सिंग सिद्धू


भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना द्वंद्वं युद्धापेक्षा कमी नसतो. 1996ला भारत आणि पाकिस्तान यांच्यात उपांत्यपूर्व फेरीत सामना झाला होता. या सामन्यात नवज्योत सिंग सिद्धू यांनी 93 धावांची तुफान फलंदाजी करत, पाकिस्तान समो 287 धावांचे आव्हान ठेवले. तर, अजय जडेजा यांनी शेवटच्या षटकात 25 चेंडूत 45 धावा केल्या. दरम्यान पहिल्या 15 ओव्हरमध्ये 115 धावा करत पाकिस्तान सोपा विजय मिळवेल असे वाटत असताना, आमेर सोहेल यांनं भारतीय गोलंदाज व्येंकटेश प्रसाद याला चौकार खेचत अरेरावी करण्यास सुरुवात केली. मात्र, दुसऱ्याचं चेंडूत प्रसादनं सोहेलची दांजी गुल केली. या विकेटमुळं पाकिस्तानला 39 धावांनी पराभव स्विकारावा लागला.

3. 1999 वर्ल्ड कप (मॅचेस्टर)

भारत : 227/6

पाकिस्तान : 180

मॅन ऑफ द मॅच : व्येंकटेश प्रसाद


कारगील युद्धानंतर भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण वातावरण होते. त्यामुळं हा सामना अझरुद्धीन आणि कं. यांच्यावर पाकिस्तान विरुद्ध सामना जिंकण्याचे आव्हान होते. दरम्यान या सामन्यात भारतानं इतिहास कायम राखत, पाकिस्तानवर सोपा विजय मिळवला. मात्र, 50 ओव्हरमध्ये भारतीय संघाला चांगली फलंदाजी करता आली नाही त्यामुळं फलंदाजांना केवळ 227 धावा करता आल्या. दरम्यान या आव्हानांचा पाठलाग करताना, व्येंकटेश प्रसाद यांनी गोलंदाजीमध्ये आपली कमान राखत 5 विकेट घेतल्या आणि पाकिस्तानचा अर्धा संघ माघारी परतला. केवळ 27 धावा देत प्रसाद यांनी ही कामगिरी केली.

4. 2003 वर्ल्ड कप (सेंट्युरिअन)

पाकिस्तान : 273/7

भारत : 276 / 4

मॅन ऑफ द मॅच : सचिन तेंडुलकर


2003 चा विश्वचषक हा भारतासाठी महत्त्वाचा विश्वचषक होता. भारताला अंतिम फेरीत ऑस्टेलियाकडून पराभव स्विकारावा लागला असला तरी, ग्रुप स्टेज मधली भारत आणि पाकिस्तान यांच्यातील लढत अटीतटीची झाली होती. या सामन्यात सचिन तेंडुलकरनं 98 धावांची तुफान खेळी होती. दरम्यान पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करत 273 धावांचे आव्हान भारतासमोर ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना सचिननं आक्रमक फलंदाजी केली. आणि भारतानं 6 विकेटनं सामना जिंकला.

5. 2011 उपांत्य फेरी (मोहाली)

भारत: 260/9

पाकिस्तान : 231

मॅन ऑफ द मॅच : सचिन तेंडुलकर


2011चा विश्वचषक भारतासाठी महत्त्वाचा विश्वचषक होता. भारताला यजमानपद मिळाल्यामुळं त्यांच्यावर चाहत्यांचा दबाव सर्वात जास्त होता. दरम्यान भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत झाली ती थेट उपांत्य फेरीत. हा सामना दोन्ही संघासाठी महत्त्वाचा होता, कारण विजय संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार होता. मात्र,या सामन्यात पाकिस्तानच्या गोलंदाजांनी स्वत:च्या हातांनी हा सामना गमावला. अगदी पहिल्या षटकापासून त्यांनी सचिन तेंडुलकरचे झेल सोडले. अखेर सचिननं 85 धावांची तुफानी पारी खेळत, पाकिस्तानसमोर 260 धावांचे आव्हान ठेवले. दरम्यान प्रथेप्रमाणे पाकिस्ताननं हा सामना गमावलाच. आणि भारतानं थेट अंतिम फेरीत प्रवेश केला. त्यानंतर श्रीलंकेला नमवत, वानखेडेवर तब्बल 28 वर्षांता दुष्काळ संपवत विजय मिळवला.

वाचा- World Cup : पंचांना एका सामन्यासाठी दिलं जातं इतकं वेतन

वाचा- इंग्लंडकडून लाजीरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या वर्ल्ड कप संघात मोठे बदल

वाचा- वर्ल्ड कप जिंकण्यासाठी भारतीय संघाचा आहे 'मास्टर प्लॅन', सराव नव्हे तर 'ही' आहे योजना!


VIDEO : जिंकणार की हरणार? एक्झिट पोलवर अमोल कोल्हेंची पहिली प्रतिक्रिया

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 20, 2019 06:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...