90 च्या दशकापासून कर्णधार कोहलीचा आहे ‘हा’ सेलिब्रेशन पॅटर्न! विराटचा लहानपणचा हा फोटो पाहून पटेल खात्री

कर्णधार विराट कोहलीने ट्विटरवरवर एक फोटो शेअर केलाय. 90 च्या दशकापासून म्हणजे आपल्या लहानपणापासूनच आपला सेलिब्रेशन पॅटर्न असाच आहे अशी कमेंटही वर केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jun 17, 2019 07:05 PM IST

90 च्या दशकापासून कर्णधार कोहलीचा आहे ‘हा’ सेलिब्रेशन पॅटर्न! विराटचा लहानपणचा हा फोटो पाहून पटेल खात्री

मुंबई, 17 जून : ICC WorldCup 2019 च्या रविवारी पार पडलेल्या भारत-पाकिस्तान सामन्यावर भारताने विजय मिळवत फादर्स डे ची खास भेट दिली. विजयाच्या निमित्ताने विराटने ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये एका बाजूला कमरेवर हात ठेवलेला लहानपणीचा विराट तर, दुसऱ्या बाजूला अगदी हुबेहूब पोझ दिलेला आत्ताचा विराट पाहायला मिळतो. कालच्या सामन्यातील एक झलक टिपण्यात आली आणि योगायोगाने ती लहानपणीचा विराटच्या फोटोशी मिळती-जुळती आहे. या फोटोचं कोलाज शेअर करत विराटने म्हंटल, “असं सेलिब्रेशन मी 90 दशकापासून करत आहे!”Loading...

कालचा भारताचा विजय आणखी खास होण्याचं कारण म्हणजे, कर्णधार कोहली हा एकदिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 11,000 धावांचं सचिन तेंडुलकरचं रेकॅार्ड तोडत वेगवान फलंदाज झाला आहे.भारताचा कर्णधार विराट कोहली मोहम्मद आमीरच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. खरंतर रिव्ह्यूमध्ये तो झेलबाद नसल्याचं दिसत होतं. कोहलीने 65 चेंडूत 77 धावा केल्या. सामन्याच्या 48 व्या षटकात कोहली बाद झाला. पंचांनी बाद देण्याच्या आधीच कोहली ड्रेसिंग रूमकडे निघाला. नंतर रिव्ह्यूमध्ये मात्र तो बाद नसल्याचं दिसलं.

वर्ल्ड कपमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात आतापर्यंत 6 वेळा सामने झाले. यात सर्व सामने भारताने जिंकले आहेत. यंदा 12 वा वर्ल्ड कप होत असून भारताने दोनवेळा तर पाकिस्तानने एकदा विजेतेपद पटकावलं आहे. वर्ल्ड कपमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारताने पहिले दोन्ही सामने जिंकले आहेत. 13 जूनचा सामना पावसाने रद्द झाला होता. गुणतक्त्यात भारत 5 गुणांसह चौथ्या स्थानी आहे. रेकॅार्डसह आता विराटसमोर आव्हान आहे ते 22 तारखेला अफगाणिस्तानासोबत होण्याऱ्या सामन्याचं!

लाजा धरा लाजा, पाकच्या आजींनी सर्फराजला झापलं, VIDEO व्हायरल

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 17, 2019 07:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...