WORLD CUP : टीम इंडियाने सामना हरला पण तरीही भारतच चॅम्पियन!

सेमीफायनमधील पराभवानंतरही भारत कसा झाला चॅम्पियन?

News18 Lokmat | Updated On: Jul 11, 2019 01:00 PM IST

WORLD CUP : टीम इंडियाने सामना हरला पण तरीही भारतच चॅम्पियन!

मुंबई, 11 जुलै : गेल्या काही दिवसांपासून भारतीय क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं होतं ते ICC Cricket World Cup या क्रिकेट जगतातील सर्वात मोठ्या समजल्या जाणाऱ्या स्पर्धेकडे. सुरुवातीच्या टप्प्यात भारतीय संघानं अपेक्षेप्रमाणे अफलातून खेळ करत जगाचं लक्ष वेधून घेतलं. मात्र वर्ल्ड कपमधील सेमीफायनच्या सामन्यात मात्र भारताला न्यूझीलंडकडून पराभवा सामना करावा लागला. सुरुवातीपासून दमदार कामगिरी करण्याऱ्या टीम इंडियाचा सेमीफायनलमध्ये पराभव झाल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.

सेमीफायनलमधील पराभवाने भलेही टीम इंडिया स्पर्धेतून बाहेर पडली असेल, पण तरीही भारत खऱ्या अर्थाने चॅम्पियन झाला आहे. एखादा देश पराभूत झाल्यानंतर तिथल्या प्रेक्षकांच्या संतप्त प्रतिक्रिया अनेकदा समोर येतात. पण भारताच्या या पराभवानंतर असं अभावानेच घडलं असेल. कारण टीम इंडियाने सामना गमावल्यानंतरही आपल्या संघाला पाठिंबा दर्शवण्यात आणि स्पर्धेतील सुरुवातीपासूनच्या कामगिरीबद्दल खेळाडूंचं कौतुक करण्याबाबत सोशल मीडियावर चाहत्यांनी कोणतीच कसर ठेवली नाही.

Loading...

'आम्ही फक्त जिंकणाऱ्या इंडियाचे नव्हे तर टीम इंडियाचे चाहते आहोत. त्यामुळे आपल्या संघाला कोणत्याही परिस्थितीत पाठिंबाच देणार,' असा सूर पराभवानंतर भारतातील क्रिकेटप्रेमींनी आवळल्याचं पाहायला मिळालं.

एकूणच भारतीय टीमची संपूर्ण स्पर्धेतील कामगिरी आणि त्यानंतर चाहत्यांनी अत्यंत प्रगल्भतेनं स्वीकारलेला पराभव पाहिल्यावर भारतच या स्पर्धेतला चॅम्पियन ठरला, असं म्हणावं लागेल.

VIDEO: मनपाच्या भोंगळ कारभाराचा बळी, खेळताना चिमुकला मॅनहोलमध्ये पडला

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 11, 2019 12:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...