मुंबई, 09 मे : आयपीएलच्या शेवटच्या साखळी सामन्यात किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळताना भारताचा खेळाडू केदार जाधव जखमी झाला होता. त्याच्या दुखापतीबद्दल आता नवीन माहिती समोर आली आहे. त्यामुळं आता केदार जाधवच्या चिंताही वाढल्या आहेत.
दरम्यान याआधी केदार जाधवला झालेली दुखापत गंभीर नसून तो वर्ल्डकपच्या आधी तंदुरुस्त होईल अशी माहिती देण्यात आली होती. मात्र आता, निवड समितीचे अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. एएसपीएनया वृत्तसंस्थेशी बोलताना त्यांनी, 23 मे पर्यंत भारताच्या संभाव्य 15 जणांच्या संघात बदल करता येऊ शकतो. तोपर्यंत केदारला दुखापतीतून सावरण्यासाठी पुरेसा वेळ मिळणार आहे. त्याची दुखापत इतकी गंभीर नसून तो त्यातून सावरेल. त्यामुळे त्याच्या बदलीचा निर्णय घेताना घाई करणार नाही, असे सांगितले.
वाचा- 'या' खेळाडूचं दुखापतींशी जुनं नातं, तरी वर्ल्ड कप संघात मिळाली संधी
विश्वचषकासाठी भारतीय संघ वर्ल्ड कप खेळण्यासाठी 22 मे रोजी इंग्लंडला रवाना होणार आहे. त्यानंतर 25 मे रोजी न्यूझीलंडविरुद्ध पहिला सराव सामना होईल. दरम्यान, केदार जाधव दुखापतीतून सावरल्यास भारतीय संघासाठी ही चांगली बाब असेल. केदार जाधव मधल्या फळीतील फलंदाज आहे. तसेच फिनिशर म्हणून धोनी त्याला पसंती देतो. फलंदाजीसह गोलंदाज म्हणूनही त्याने चांगली कामगिरी केली आहे. त्याच्या फिरकीच्या जाळ्यात अनेक फलंदाज अडकले आहेत.
वाचा- World Cup मधून बाहेर हा खेळाडू? पंतसह 4 जण पर्याय
केदार जाधव आय़पीएलच्या गेल्या हंगामातही जखमी झाला होता. तसेच गेल्या वर्षीच्या आशियाई चषकाच्या अंतिम सामन्यातही दुखापतीने त्याला मैदान सोडावे लागले होते. त्यानंतर त्याच्या तंदुरुस्तीवरून सवाल उपस्थित केले जात होते.
भारतीय संघाच्या चिंता वाढल्या
भारताने विश्वचषकासाठी जाहीर केलेल्या 15 खेळाडूंच्या यादीत केदार जाधवचही नाव आहे. दरम्यान, काही दिवासांवर विश्वचषक आला असताना, खेळाडूंची ही दुखापत संघासाठी चिंतेचा विषय ठरत आहे. जर केदार जाधवची ही दुखापत गंभीर असेल तर त्याला विश्वचषकालाही मुकावं लागेल. त्यामुळं केदार जाधवच्या जागी रिषभ पंत किंवा अंबाती रायडू यांना संघात संधी मिळू शकते. रिषभ पंतला सध्या राखीव खेळाडू म्हणून ठेवले आहे.
वाचा- वर्ल्ड कपआधी भारताचा ‘हा’ खेळाडू झाला जखमी, पंतला मिळणार संधी ?
VIDEO : जब मिले दो यार, मग मैदानात नुसता राडा!