2015 च्या वर्ल्ड कपमध्ये शेवटचा सामना खेळला, आता थेट संघाच्या कर्णधारपदी

world cup 2019 : श्रीलंकेच्या संघाची घोषणा, लसिथ मलिंगाकडून काढून घेतले कर्णधारपद

News18 Lokmat | Updated On: Apr 18, 2019 03:18 PM IST

2015 च्या वर्ल्ड कपमध्ये शेवटचा सामना खेळला, आता थेट संघाच्या कर्णधारपदी

कोलंबो, 18 एप्रिल : भारत आणि इंग्लंड यांच्यानंतर श्रीलंका क्रिकेट बोर्डाने वर्ल्ड कपसाठीच्या संघाची घोषणा केली. यापूर्वी त्यांनी कर्णधार बदलल्याची माहिती दिली होती. लसिथ मलिंगाऐवजी दिमुथ करुणारत्नेकडे संघाची कमान सोपवली आहे. त्याला एकाही एकदिवसीय सामन्यात नेतृत्व करण्याचा अनुभव नसताना ही जबाबदारी दिली आहे.इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्ड कपमध्ये श्रीलंकेच्या संघात अकिला धनंजयाला जागा मिळाली नाही. त्याचबरोबर यष्टीरक्षक निरोशन डिक्वेला, उपुल थरंगा आणि वेगवान गोलंदाज लक्षण संदकनलाही संघातून वगळण्यात आलं आहे. डिक्वेलाच्या जागी कुसल परेराकडे यष्टीरक्षणाची जबाबदारी असणार आहे. वेगवान गोलंदाजीची धुरा लसिथ मलिंगाच्या खांद्यावर असेल.

नशेत गाडी चालवलेल्या क्रिकेटपटूच्या हाती वर्ल्ड कपचे नेतृत्व

Loading...

वर्ल्ड कपच्या कर्णधारपदाची धुरा सांभाळणाऱ्या करुणारत्नेने फक्त 17 एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्याला एकदिवसीय सामन्यात कर्णधारपदाचा कोणताही अनुभव नाही. इतकंच काय फलंदाज म्हणूनही त्याची कामगिरी निराशाजनक राहीली आहे. कसोटी संघाचा कर्णधार झाल्यानंतर त्याच्या नेतृत्वाखाली दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर ऐतिहासिक विजय मिळवला हीच करुणारत्नेची जमेची बाजू आहे.

श्रीलंकेचा संघ : दिमुथ करुणारत्ने(कर्णधार), अविष्का फर्नांडो, लाहिरू थिरिमाने, कुसल परेरा, थिसारा परेरा, इसुरु उदाना, लिसिथ, सुरंगा लकमल, नुवान प्रदीप, जीवन मेंडिस आणि मिलिंदा सिरिवर्धना

भाजप नेत्यावर चप्पल फेकून मारल्याने खळबळ, पाहा व्हिडिओ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 18, 2019 03:18 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...