लंडन, 29 एप्रिल : पाकिस्तानचा संघ इंग्लंड दौऱ्यावर पोहचला असून त्यांच्या सराव सामन्यांना सुरुवात झाली आहे. रविवारी केंट विरुद्ध पहिला सामना झाला. या सामन्यात पाकिस्तानने 100 धावांनी विजय मिळवला. मात्र, यावेळी एक वादही निर्माण झाला. यानंतर पाकिस्तानच्या संघावर टीका केली जात आहे.
पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने स्वत:च्या गोलंदाजीवर एक झेल घेतला. हा झेल बरोबर होता असं पाकिस्तानने म्हटलं आहे. तर केंटनं हा झेल सुटला असल्याचं म्हटलं आहे. झेल घेतल्याचा जल्लोष करण्याच्या नादात अलीच्या हातातून चेंडू सुटला.
अलीच्या चेंडूवर केंटचा फलंदाज अॅलेक्स ब्लॅकने फटका मारला. त्यावेळी उंच उडालेला चेंडू अलीने झेलला. तेव्हा काही वेळातच अलीच्या हातून चेंडू निसटला. दरम्यान, अलीने झेल घेतला असे समजून अॅलेक्सने मैदान सोडलं. त्याचा सहकारी रॉबिन्सनने झेल सुटल्याचा दावा करताना अॅलेक्सला थांबवण्याचाही प्रयत्न केला. पण तोपर्यंत तो मैदानाबाहेर पोहचला होता. अॅलेक्सने 89 धावा केल्या.
Pakistan & Hasan Ali say the catch was taken & then the celebration
— Saj Sadiq (@Saj_PakPassion) April 28, 2019
Kent feel that the ball was dropped during the celebration#KENTvPAK pic.twitter.com/EsHQqLgfIM
पाकिस्तानने 7 बाद 358 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल केंटला 258 धावा करता आल्या. पाकिस्तान हा पहिला संघ आहे जो वर्ल्ड कपसाठी इंग्लंडला पोहचला आहे. वर्ल्ड कपच्या आधी इंग्लंडविरुद्ध त्यांचा एक टी 20 सामना आणि 5 एकदिवसीय सामन्यांची मालिका होणार आहे.
VIDEO: 'तू चाल पुढं.. तुला रं गड्या भीती कशाची.. पर्वा बी कुणाची'