वर्ल्ड चॅम्पियन सिंधुचे मायदेशात जल्लोषात स्वागत, पंतप्रधान मोदींनी असं केलं अभिनंदन!

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवल्यानंतर भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू मायदेशात परतली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 27, 2019 02:36 PM IST

वर्ल्ड चॅम्पियन सिंधुचे मायदेशात जल्लोषात स्वागत, पंतप्रधान मोदींनी असं केलं अभिनंदन!

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपमध्ये विजय मिळवून भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू मंगळवारी पहाटे भारतात परतली. त्यानंतर सिंधूनं पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली. यावेळी पंतप्रधान मोदींनी ही भारतासाठी गर्वाची गोष्ट असून चॅम्पियन पीव्ही सिंधुची भेट घेतल्यानं आनंद झाला असं म्हटलं.

स्वित्झर्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये विजय मिळवत पीव्ही सिंधुनं इतिहास रचला. सिंधूनं सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. यावेळी तिनं एकदाही कमबॅक करण्याची संधी दिली नाही. 21-7, 21-7 अशा दोन सेटमध्ये सिंधूनं बाजी मारली.

जपानच्या नाओमी ओकुहारासोबत होत असलेल्या सामन्यात सिंधूनं टॉस जिंकत सर्व्ह करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान 22 शॉट्सच्या पहिल्या रॅलीमध्ये सिंधूनं 4-1ची आघाडी घेतली. हिच आघाडी पुढे घेऊन जात सिंधूनं 18-4ची लीड मिळवली. अखेर पहिला सेट सिंधूनं 21-7नं जिंकला तर, दुसरा सेटही 21-7नं जिंकला.

सिंधुला शुभेच्छा दिल्यानंतर पंतप्रधान मोदींनी तिच्या गळ्यात गोल्ड मेडल घातलं. तिला भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या.  मोदींची भेट घेण्यापूर्वी सिंधुनं क्रीडा मंत्री किरण रिजजू यांची भेट घेतली होती. क्रीडा मंत्र्यांनी तिला 10 लाख रुपयांचा चेक दिला.

2017मध्ये झालेल्या विश्व चॅम्पियन स्पर्धेत नाओमी ओकुहारानं सिंधूला हरवले होते. या दोघांमध्ये आतापर्यंत 15 सामने झाले आहे. त्यातील 8 सामन्यात सिंधूनं विजय मिळवला आहे. 2017मध्ये सिंधू आणि ओकुहारा यांच्यात तब्बल 110 मिनीटे सामना चालला होता. वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या इतिहासतला हा सर्वात मोठा अंतिम सामना होता. यात 73 शॉट्सची रॅली झाली होती.

Loading...

 सिंधूनं सलग तिसऱ्यांदा विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, आतापर्यंत एकदाही सिंधूला विजय मिळवता आलेला नाही. या विजयासह यिंग विरोधात सिंधूचा रेकॉर्ड आता 5-10 झाला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: pv sindhu
First Published: Aug 27, 2019 02:34 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...