Boxing : सहावेळा जग्गजेता बॉक्सर मेरी कोम घेणार निवृत्ती

Boxing : सहावेळा जग्गजेता बॉक्सर मेरी कोम घेणार निवृत्ती

देशाला ऑलिम्पिक पदक मिळवून देण्याचं ध्येय असल्याचं मेरी कोमनं सांगितलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 06 जून : भारताची स्टार बॉक्सर आणि सहा वेळा जग्गजेता असलेल्या मेरी कोमनं निवृत्ती घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. 2020 मध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेनंतर निवृत्ती घेणार आहे असं तिने गुरुवारी सांगितलं. देशाला ऑलिम्पिकचं पदक मिळवून देण्याचं ध्येय असल्याचं मेरी कोमने म्हटलं. निवृत्तीबद्दल ती म्हणाली की, मला निवृत्त व्हायचं असून 2020 च्या ऑलिम्पिकनंतर हा निर्णय घेईन.

एएनआयशी बोलताना मेरी कोम म्हणाली की, अनेक युवा खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. त्यांच्यातून आपल्याला आणखी एखादी मेरी कोम मिळेल अशी आशा आहे.

मेरी कोमने तिच्या बॉक्सिंग करिअरमध्ये 6 वेळा वर्ल्ड चॅम्पियशीप तर एकूण 7 पदके पटकावली आहेत. गेल्या 16-17 वर्षांत तिने 48 किलो वजनी गटात खेळली होती . आता ती 51 किलो वजनी गटातून ऑलिम्पिकला उतरण्याच्या तयारीत आहे. 2012 च्या ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ आणि 2019 इंडिया ओवरमध्ये सुवर्ण पदक जिंकलं होतं. यावेळी तिनं 51 वजनी गटात सहभाग घेतला होता.

जपानमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेत माझा अनुभव कामी येईल. मी सामन्यात स्वत:ला सिद्ध करेन असं मेरी कोम म्हणाली. 2020 च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या पात्रतेसाठी तयारी सुरु केली असल्याचंही मेरी कोमनं म्हटलं आहे.

वाचा- World Cup : धोनीनं लष्कराला दिला अनोखा सन्मान, 'या' एका कृतीमुळं जिंकलं चाहत्यांच मन

वाचा-World Cup : सामना जिंकूनही टीम इंडियाला फटका, गुणतालिकेत 'हा' संघ पहिल्या क्रमांकावर


खुशखबर! येत्या 24 तासांत मान्सून केरळमध्ये दाखल होणार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Boxing
First Published: Jun 6, 2019 07:17 PM IST

ताज्या बातम्या