World Badminton Championships 2019 : सिंधूची ऐतिहासिक कामगिरी! वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय

World Badminton Championships 2019 : सिंधूची ऐतिहासिक कामगिरी! वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकणारी पहिली भारतीय

World Badminton Championships 2019 : सिंधूनं रचला इतिहास, वर्ल्ड चॅम्पियनशीप जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू

  • Share this:

बासेल, 25 ऑगस्ट : भारताची स्टार बॅडमिंटन खेळाडू पीव्ही सिंधूनं अखेर वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये विजय मिळवत इतिहास रचला. सिंधूनं सरळ दोन सेटमध्ये विजय मिळवला. यावेळी तिनं एकदाही कमबॅक करण्याची संधी दिली नाही. 21-7, 21-7 अशा दोन सेटमध्ये सिंधूनं बाजी मारली.

जपानच्या नाओमी ओकुहारासोबत होत असलेल्या सामन्यात सिंधूनं टॉस जिंकत सर्व्ह करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान 22 शॉट्सच्या पहिल्या रॅलीमध्ये सिंधूनं 4-1ची आघाडी घेतली. हिच आघाडी पुढे घेऊन जात सिंधूनं 18-4ची लीड मिळवली. अखेर पहिला सेट सिंधूनं 21-7नं जिंकला तर, दुसरा सेटही 21-7नं जिंकला.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच सिंधूनं आक्रमक खेळी करत ओकुहाराला खेळावर नियंत्रण मिळवून दिले नाही. त्यानंतर 27 शॉट्सच्या रॅलीनं सिंधूनं पहिला सेटचा जिंकल्यानंतर ओकुहारानं कमबॅक करण्याचा प्रयत्न केला. मात्र सिंधूनं ही संधी तिला दिली नाही.

घेतला 2017चा बदला

2017मध्ये झालेल्या विश्व चॅम्पियन स्पर्धेत नाओमी ओकुहारानं सिंधूला हरवले होते. या दोघांमध्ये आतापर्यंत 15 सामने झाले आहे. त्यातील 8 सामन्यात सिंधूनं विजय मिळवला आहे. 2017मध्ये सिंधू आणि ओकुहारा यांच्यात तब्बल 110 मिनीटे सामना चालला होता. वर्ल्ड चॅम्पियनशीपच्या इतिहासतला हा सर्वात मोठा अंतिम सामना होता. यात 73 शॉट्सची रॅली झाली होती.

सरळ सेटमध्ये केला सेमीफायनलमध्ये प्रवेश

सेमीफायनलमध्ये झालेल्या सामन्यात चीनच्या चेन यू फेई (Chen yu Fei)चा सलग सेटमध्ये पराभव करत फायनलमध्ये दणक्यात एण्ट्री घेतली. सिंधूनं 40 मिनिटे चाललेल्या खेळात फेईचा 21-7,21-14नं पराभव केला. पहिल्या गेमपासूनच सिंधूनं आघाडी मिळवली होती. त्यामुळं चेन प्रचंड दबावात खेळत होती. चेनचा या एका गोष्टीचा फायदा सिंधूनं घेतला आणि ब्रेक पर्यंत 11-3ची आघाडी मिळवली. ब्रेकनंतर चेन क्रोस कोर्ट खेळत गुण मिळवण्याचा प्रयत्न करत होती. मात्र तिचे प्रयत्न सिंधूच्या खेळीसमोर फोल ठरले. सिंधूनं दमदार स्मॅश आणि कोर्ट कव्हरेजच्या जोरावर 15 मिनिटांचा पहिला गेम 21-7नं आपल्या नावावर केला.

दोन वर्षांपासून हुकले होते सिंधूचे सुवर्ण

सिंधूनं सलग तिसऱ्यांदा विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, आतापर्यंत एकदाही सिंधूला विजय मिळवता आलेला नाही. या विजयासह यिंग विरोधात सिंधूचा रेकॉर्ड आता 5-10 झाला आहे.

VIDEO: शेवटी जिंकणार मीच, सुप्रिया सुळेंचा सरकारला खुले आव्हान

Published by: Akshay Shitole
First published: August 25, 2019, 6:12 PM IST
Tags: pv sindhu

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading