वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपला सुरुवात, तिरंगा फडकणार का ?

यावेळी सिंधूकडून सुवर्णपदकाची अपेक्षा करण्यात येते आहे. तसंच सायना नेहवालच्या कामगिरीकडेही सगळ्यांचं लक्ष असणार आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Aug 21, 2017 01:41 PM IST

वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपला सुरुवात, तिरंगा फडकणार का ?

ग्लासगो,21 ऑगस्ट: ग्लासगोमध्ये वर्ल्ड बॅडमिंटन चॅम्पियनशिपला आज सुरुवात होणार आहे. या चॅम्पियनशिपमध्ये भारतीयांची नजर पी.व्ही.सिंधू आणि श्रीकांत यांच्या खेळावर असेल.

पी.व्ही.सिंधूनं दोनवेळा या स्पर्धेत कांस्य पदक पटकावलंय. त्यामुळे यावेळी सिंधूकडून सुवर्णपदकाची अपेक्षा करण्यात येते आहे. तसंच सायना नेहवालच्या कामगिरीकडेही सगळ्यांचं लक्ष असणार आहे. या स्पर्धेत 2015 साली सायना रौप्य पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती. काही दिवसांपासून सायना दुखापतग्रस्त होती. पण आता सायना फिट असल्याचं सांगण्यात येतंय. सिंधूची पहिली लढत कोरियाच्या किम यो मिन किंवा इजिप्तच्या हादीया होत्सनेशी होण्याची शक्यता आहे.

या चॅम्पियनशिपमध्ये भारतीय. खेळाडू कशी कामगिरी करतात याकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 21, 2017 01:40 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...