World Badminton Championship : सलग तिसऱ्यांदा सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक, तर सायनाला बसला मोठा धक्का!

World Badminton Championshipमध्ये सिंधूनं तिसऱ्यांदा मिळवली सेमीफायनलमध्ये जागा.

News18 Lokmat | Updated On: Aug 23, 2019 07:39 PM IST

World Badminton Championship : सलग तिसऱ्यांदा सिंधूची सेमीफायनलमध्ये धडक, तर सायनाला बसला मोठा धक्का!

बासेल, 23 ऑगस्ट : भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधूनं World Badminton Championshipच्या सेमीफायनलमध्ये जागा निश्चित केली आहे. पूर्व उपांत्य फेरीत तायवानच्या ताय त्जु यिंगला(Tai Tzu Zing)12-21, 23-21, 21-19ने नमवले. सध्या सुरू असलेल्या विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीपमध्ये जगक्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सिंधूनं 1 तास 11 मिनीटांपर्यंत लढत दिली. सलग तिसऱ्यांदा सिंधूनं सेमीफायनलमध्ये आपली जागा मिळवली.

ऑलिम्पिकमध्ये रजत पदक मिळालेल्या 24 वर्षीय सिंधूला फायनलमध्ये जागा निश्चित करण्यासाठी चीनच्या यू फेई आणि डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्ट यांच्यातील विजेत्याला नमवावे लागणार आहे.

दोन वर्षांपासून हुकले आहे सिंधूचे सुवर्ण

सिंधूनं सलग तिसऱ्यांदा विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीपच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. मात्र, आतापर्यंत एकदाही सिंधूला विजय मिळवता आलेला नाही. या विजयासह यिंग विरोधात सिंधूचा रेकॉर्ड आता 5-10 झाला आहे.

वाचा-टीम इंडियातील खेळाडूनं धोनीला सुनावले खडेबोल, आता घेतला यू-टर्न!

सायना झाली खराब अम्पायरिंगची शिकार

सायना नेहवालचे विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीपमधील आव्हान संपुष्टात आले. मात्र, सायनानं यासाठी पंचांना कारणीभूत ठरवले आहे. सायनानं ट्वीट करत पंचांवर निशाना साधला. सायनाच्याआधी भारतीय खेळाडू आणि सायनाचे पती परूपल्ली कश्यप यानं, पंचांच्या निर्णयावर नाराजी व्यक्ती केली. सायनानं, "पंचांच्या खराब निर्णयामुळं 2 मॅच पॉईंट मिळाले नाहीत. मला विश्वास बसत नाही आहे. दुसऱ्या गेममध्ये पंचांनी दोन वेळा मला पॉईंट दिले नाहीत, कदाचित खेळ पलटला असता", असे ट्वीट केले आहे.

वाचा-फक्त धोनीची नाही तर पंत घेणार 'या' फलंदाजीची सुध्दा जागा, सेहगानं केला खुलासा

सायना नेहवाल स्पर्धेबाहेर

ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्य पदक जिंकणारी सायना नेहवाल विश्व बॅडमिंटन चॅम्पियनशीप स्पर्धेबाहेर गेली आहे. पूर्व उपांत्य फेरीत डेन्मार्कच्या मिया ब्लिचफेल्टनं सायनाचा पराभव केला. एक तास 12 मिनिटे चालल्या या सामन्यात 15 -21, 27-25, 21-12 अशा तीन सेटमध्ये सायनाला पराभव स्विकारावा लागला.

वाचा-'अनुष्कामुळेच मी सरळमार्गी झालो', विरुष्कानं पुन्हा एकदा दिले कपल गोल्स!

SPECIAL REPORT: डीजे बंदीचा पुणेरी घोळ! डॉल्बीनंतर आता ढोलताशांवरही कडक निर्बंध

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 23, 2019 07:39 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...