Home /News /sport /

वेस्ट इंडिजच्या खेळाडूनं घेतला वर्ल्ड कपमधील सर्वात बेस्ट कॅच, डोळ्यावर बसणार नाही विश्वास VIDEO

वेस्ट इंडिजच्या खेळाडूनं घेतला वर्ल्ड कपमधील सर्वात बेस्ट कॅच, डोळ्यावर बसणार नाही विश्वास VIDEO

वेस्ट इंडिज विरूद्ध इंग्लंड (West Indies vs England) यांच्यात महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील मॅच सुरू आहे. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजची खेळाडू डिएंड्रा डॉटीन (Deandra Dottin) हिनं एक अफलातून कॅच घेतला आहे.

  मुंबई, 9 मार्च : वेस्ट इंडिज विरूद्ध इंग्लंड (West Indies vs England) यांच्यात महिला वर्ल्ड कप स्पर्धेतील मॅच सुरू आहे. या मॅचमध्ये वेस्ट इंडिजची खेळाडू डिएंड्रा डॉटीन (Deandra Dottin) हिनं एक अफलातून कॅच घेतला आहे. या वर्ल्ड कपमधील आत्तापर्यंतचा सर्वात बेस्ट कॅच असं या कॅचचं वर्णन केलं जात आहे. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या महिला वर्ल्ड कपमधील मॅचमध्ये (Women's World Cup 2022) वेस्ट इंडिजनं पहिल्यांदा बॅटींग करत निर्धारित 50 ओव्हर्समध्ये 6 आऊट 225 रन केले. इंग्लंडची टीम 226 रनचा पाठलाग करण्यासाठी मैदानात आली त्यावेळी डॉटीननं अफलातून फिल्डिंग करत सर्वांनाच थक्क केलं. इंग्लंडच्या इनिंगमधील 9 व्या ओव्हरमध्ये हा प्रकार घडला. शामिलिया कॉनेलच्या बॉलिंगवर विनफिल्ड हिलनं पॉईंटच्या दिशेनं शॉट लगावला होता. त्या भागामध्ये डॉटिन फिल्डिंग करत होती. तिने काही समजण्याच्या आत डाईव्ह लगावत एका हातानं हवेत जबरदस्त कॅच घेतला. या कॅचमध्ये हिल फक्त 12 रन काढून आऊट झाली. डॉटीननं घेतलेल्या कॅचवर तिचा विश्वास बसत नव्हता.
  View this post on Instagram

  A post shared by ICC (@icc)

  आयसीसीनं या कॅचचा व्हिडीओ त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला असून तो सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. डॉटीननं या मॅचमध्ये ओपनिंगला येत 31 रनची खेळी केली होती. चुकीला माफी नाही! आता बिनधास्त होणार Mankading, क्रिकेटच्या नियमांत मोठे बदल पहिल्या मॅचमध्येही केली होती कमाल वेस्ट इंडिजनं पहिल्या मॅचमध्ये यजमान न्यूझीलंडचा 3 रननं निसटता पराभव केला होता. त्या मॅचमध्येही डॉटीननं शेवटच्या ओव्हरमध्ये मॅचचं चित्र बदललं होतं. न्यूझीलंडला विजयासाठी शेवटच्या ओव्हरमध्ये 6 रन हवे होते. त्यावेळी मॅचमधील पहिली ओव्हर टाकण्यासाठी आलेल्या डॉटीननं पाच बॉलमध्ये 2 विकेट्स घेतल्या आणि एकीला रन आऊट करत न्यूझीलंडला ऑल आऊट केले. त्यानंतर इंग्लंड विरूद्धही तिनं जबरदस्त फिल्डिंग करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Cricket, England, Live video viral, West indies

  पुढील बातम्या