मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /BCCI सगळ्यात श्रीमंत, पण... महिला क्रिकेटबाबत समोर आली धक्कादायक माहिती

BCCI सगळ्यात श्रीमंत, पण... महिला क्रिकेटबाबत समोर आली धक्कादायक माहिती

गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय महिला क्रिकेट (Team India) टीमच्या कामगिरीमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. भारतीय टीम मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) फायनलमध्ये पोहोचली, पण फायनलमध्ये त्यांचा पराभव झाला.

पुढे वाचा ...

मुंबई, 23 मे : गेल्या काही वर्षांमध्ये भारतीय महिला क्रिकेट (Team India) टीमच्या कामगिरीमध्ये कमालीची सुधारणा झाली आहे. भारतीय टीम मागच्यावर्षी ऑस्ट्रेलियात झालेल्या टी-20 वर्ल्ड कपच्या (T20 World Cup) फायनलमध्ये पोहोचली, पण फायनलमध्ये त्यांचा पराभव झाला. स्पर्धेत दुसरे आल्यामुळे भारतीय टीमला आयसीसीकडून 3.70 कोटी रुपये मिळाले होते, पण बीसीसीआयने (BCCI) खेळाडूंना अजूनही ही रक्कम दिलेली नाही. म्हणजेच 14 महिन्यांनंतरही खेळाडू पैशांच्या प्रतिक्षेत आहेत.

टेलिग्राफने दिलेल्या वृत्तानुसार भारतीय महिला खेळाडूंना अजूनपर्यंत ही रक्कम मिळालेली नाही. फेडरेशन ऑफ इंटरनॅशनल क्रिकेटर्सचे (FICA) सीईओ टॉप मॉफेट म्हणाले, 'मागच्यावर्षी ऑगस्ट महिन्यात पैसे मिळाले नसल्याबाबत आम्हाला माहिती मिळाली. आयसीसीच्या बैठकीतही हा मुद्दा उपस्थित करण्यात आला. ही रक्कम खेळाडूंना मैदानातल्या कामगिरीच्या आधारावर मिळाली आहे, त्यामुळे हे पैसे द्यायला लागलेला उशीर स्वीकार करू शकत नाही. याबाबत आम्ही भारतीय खेळाडूंशीही संपर्क केला, तसंच त्यांना प्लेयर्स असोसिएशनमध्ये सहभागी होण्यासाठीही आम्ही प्रोत्साहित करत आहोत, यामुळे त्यांना जगातल्या अन्य खेळाडूंप्रमाणेच लाभ होईल.'

भारत आणि पाकिस्तान ही दोनच मान्यताप्राप्त बोर्ड आहेत, जिकडे कोणत्याही प्रकारची खेळाडूंची असोसिएशन नाही. या स्पर्धेची रक्कम द्यायची जबाबदारी आयसीसीची असते, त्यामुळे स्पर्धा संपल्यानंतर एका आठवड्यात आयसीसीला ही रक्कम संबंधित बोर्डाला द्यावी लागते. आयसीसीने बीसीसीआयला ही रक्कम दिली, त्यानंतर बीसीसीआयने 14 दिवसात खेळाडूंना हे पैसे देणं गरजेचं होतं.

टी-20 वर्ल्ड कपची फायनल झाल्यानंतर भारतीय महिला टीम जवळपास एक वर्ष एकही मॅच खेळली नाही. तर दुसरीकडे पुरुष टीम या कालावधीमध्ये 8 टेस्ट, 6 वनडे खेळली. एवढच नाही तर आयपीएलच्या 60 सामन्यांचं आयोजनही करण्यात आलं. या कालावधीमध्ये महिला आयपीएलचे 4 सामनेच खेळवण्यात आले. टी-20 वर्ल्ड कप संपल्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या टीमला एका महिन्यातच पैसे मिळाले होते, तर सेमी फायनलमध्ये पोहोचलेल्या इंग्लंडच्या टीमला दोन महिन्यांनी ही रक्कम देण्यात आली होती.

टी-20 वर्ल्ड कप खेळलेल्या 15 सदस्यांच्या टीममधल्या प्रत्येकाला जवळपास 24 लाख रुपये मिळणार आहेत. बीसीसीआयशी करारबद्ध असलेल्या 13 खेळाडूच या रकमेपेक्षा जास्त पैसे मिळवतात, त्यामुळे खेळाडूंसाठी ही रक्कम किती महत्त्वाची आहे, हे दिसतं. यावेळी बीसीसीआयने 19 महिला खेळाडूंसोबत करार केला आहे. टॉप ग्रेडमधल्या खेळाडूंना 50 लाख रुपये बीसीसीआय देतं.

First published:

Tags: BCCI, Cricket, T20 world cup, Team india