सिडनी, 05 मार्च : भारत आणि इंग्लंड (India vs England) यांच्यात आयसीसी टी-20 महिला वर्ल्ड कपमध्ये (Womens T20 World Cup) सेमीफायनल सामना होत आहे. मात्र या सामन्यावर पावसाचे संकट आहे. सिडनीमध्ये होत असलेल्या मुसळधार पावसामुळं टॉसही लांबला आहे. मात्र पाऊस थांबला नाही तर एकही चेंडू न खेळता एका संघाचे वर्ल्ड कप जिंकण्याचे स्वप्न धुळीस मिळेल.
आयसीसीच्या वतीने वर्ल्ड कपमध्ये रिझर्व्ह डे ठेवण्यात आलेला नाही. त्यामुळं सामना रद्द झाल्यास गुणतालिकेनुसार एक संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. या नियमानुसार भारतीय संघाने गटसाखळीत एकही सामना गमावलेला नाही. त्यामुळं सामना रद्द झाल्यास भारतीय संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करेल. तर दुसरीकडे आजच दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा दुसरा सेमीफायनल सामना होत आहे. त्यामुळं या नियमानुसार भारत-दक्षिण आफ्रिका हे संघ थेट फायनलमध्ये प्रवेश करतील.
वाचा-वर्ल्ड कप जिंकण्यापासून भारतीय संघ दोन पाऊलं दूर, पावसामुळं टॉस लांबला
☔ India v England weather update To complete a 10 over a side match, the toss must be held by 4.36pm local time, and play must commence by 4.51pm local time. We will keep you updated as the day progresses.#INDvENG | #T20WorldCup pic.twitter.com/MVUfMBcuC4
— T20 World Cup (@T20WorldCup) March 5, 2020
वाचा-Women T20 World cup : ...तर सेमीफायनल न खेळता टीम इंडिया थेट फायनलमध्ये धडकणार
..तर भारतीय संघ जाणार फायनलमध्ये
पाऊस पडल्याने सेमीफायनल रद्द झाल्यास भारतीय संघाला फायदा मिळेल. याचे कारण भारताने ग्रुप स्टेजमध्ये केलेली कामगिरी ठरणार आहे. भारताने ग्रुप स्टेजमध्ये चारही सामन्यात विजय मिळवला आहे. पहिल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला 17 धावांनी कप दुसऱ्या सामन्यात बांगलादेशला 18 धावांनी पराभूत केलं. न्यूझीलंडविरुद्धची लढत रोमहर्षक झाली होती. यामध्ये भारताने 3 धावांनी निसटता विजय मिळवला होता. शेवटच्या सामन्यात लंकेला 7 गडी राखून धूळ चारली. दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेनंसुद्धा एकही सामना गमावला नाही. त्यामुळे त्यांनाही सेमीफायनलमध्ये सामना रद्द झाल्यास फायदा होईल.
वाचा-क्रिकेटचं किट खरेदीसाठी नव्हते पैसे, वर्ल्ड कप गाजवणाऱ्या मुलीचे वडील विकतात दूध
काय सांगतो हवामान खात्याचा अंदाज
सेमीफायनलच्या सामन्यावर पावसाचे सावट आहे. हवामान विभागानुसार सिडनीत पावसाची दाट दिवसभर मुसळधार पावसाची शक्यता आहे. सकाळी 9 ते रात्री 10 या वेळेत पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने नोंदवला आहे. मात्र सध्याची परिस्थिती पाहत सामना होणार की नाही यावर शंक आहे. टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिकेला हा पाऊस वरदान ठरू शकतो तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का बसू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket, T20 world cup