महिला टी20 वर्ल्ड कप फायनलआधी PM मोदी आणि मॉरिसन यांच्यात Twitter वॉर

महिला टी20 वर्ल्ड कप फायनलआधी PM मोदी आणि मॉरिसन यांच्यात Twitter वॉर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ट्विटरवरून भारतीय महिला संघाला शुभेच्छा दिल्या. यावेळी त्यांनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या ट्वीटवर रिप्लाय दिला.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 मार्च : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ट्विटरवरून भारतीय महिला संघाला शुभेच्छा दिल्या. भारत आणि ऑस्ट्रेलिया संघात महिला टी20 वर्ल्ड कपची फायनल मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर होणार आहे. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आयसीसी टी20 वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतीय टीम जेव्हा मैदानात उतरेल तेव्हा स्टेडियम नीळ्या रंगात रंगलेलं दिसेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांच्या ट्विटला उत्तर दिलं आहे. मॉरिसन यांनी मोदींना टॅग करून ट्विट केलं होतं. ते म्हणाले होते की,'मोदीजी, मेलबर्नवर महिला टी20 वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा भारताशी सामना होणार आहे. एमसीजीवर मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या प्रेक्षकांसमोर दोन जबरदस्त संघ असतील. सगळीकडे ऑस्ट्रेलियाचा धमाका असेल.'

ऑस्ट्रेलियाच्या पंतप्रधानांनी ट्वीट केल्यानंतर मोदींनी त्यावर रिप्लाय दिला. मोदींनी म्हटलं की,'मॉरिसन, टी20 वर्ल्डकपमध्ये अंतिम सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया यापेक्षा मोठं काही असू शकत नाही. भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलिया महिला संघाला शुभेच्छा आणि महिला दिनाच्या शुभेच्छा. चांगलं खेळणारा संघ जिंकूदे. निळ्या पर्वताप्रमाणे एमसीजीसुद्धा निळ्या रंगात रंगेल.

अंतिम सामन्यात समोर समोर भीडणाऱ्या संघानीच वर्ल्ड कपच्या उद्घाटनाचा सामना खेळला होता हा एक योगायोग आहे. त्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला 17 धावांनी पराभूत केलं होतं. भारतीय महिला संघ पहिल्यांदा महिला टी20 वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. याआधी महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारतीय संघ दोन वेळा खेळला आहे. 2005 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तर 2017 मध्ये इंग्लंडविरुद्ध टीम इंडियाला पराभूत व्हावं लागलं होतं.

संभाव्य प्लेइंग इलेव्हन ऑस्ट्रेलिया : बेथ मूने, अॅलिसा हीली, मॅग लॅनिंग, अॅश्ले गार्डनर, रिशेल हायन्स, जेस जोनासन, निकोला कॅरी, डेलिसा कमिंस, मॉली स्ट्रानो, सोफी मॉलीन्यूक्स, मेगन शूट

संभाव्य प्लेइंग इलेव्हन भारत : शेफाली वर्मा, स्मृति मानधना, जेमिमाह रॉड्रिग्ज, हरमनप्रीत कौर, दीप्ति शर्मा, वेदा कृष्णामूर्ति, तानिया भाटिया, शिखा पांडे, राधा यादव, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड़

हे वाचा : भारत-ऑस्ट्रेलिया फायनलवरही पावसाचे सावट, सामना रद्द झाल्यास काय होणार?

First published: March 7, 2020, 8:09 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading