मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /Womens T20 WC : सराव सामन्यात भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाचा 44 धावांनी विजय

Womens T20 WC : सराव सामन्यात भारताचा पराभव, ऑस्ट्रेलियाचा 44 धावांनी विजय

ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 8 बाद 129 धावा करून भारतासमोर 130 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताला 15 षटकात 85 धावांपर्यंतच मजल मारता आली.

ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 8 बाद 129 धावा करून भारतासमोर 130 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताला 15 षटकात 85 धावांपर्यंतच मजल मारता आली.

ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 8 बाद 129 धावा करून भारतासमोर 130 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताला 15 षटकात 85 धावांपर्यंतच मजल मारता आली.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

केपटाऊन, 06 फेब्रुवारी : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील महिला क्रिकेट संघांमध्ये टी20 वर्ल्ड कप 2023 चा सराव सामना झाला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारतावर दणदणीत विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने 20 षटकात 8 बाद 129 धावा करून भारतासमोर 130 धावांचे आव्हान ठेवले होते. मात्र भारताला 15 षटकात 85 धावांपर्यंतच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने हा सामना 44 धावांनी जिंकला.

ऑस्ट्रेलियाने दिलेल्या १३० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची अडखळत सुरुवात झाली. ५.३ षटकात ४० धावातच भारताचे ५ फलंदाज बाद झाले होते. जेमीमा रॉड्रीग्ज बाद झाल्यानंतर स्मृती मानधना खातेही न उघडता बाद झाली. त्यानतंर शफाली वर्मा ४ धावांवर तर ऋषा घोष ५ धावा करून तंबूत परतली. आघाडीची फळी बाद झाल्यानंतर मधल्या फळीत यास्तिका भाटिया आणि हरलीन देओलसुद्धा लगेच बाद झाल्या.

भारताची गोलंदाज शिखा पांडेने ऑस्ट्रेलियाला सुरुवातीला दोन धक्के दिले. तिने मेग लेनिंगला शून्यावर तर ताहिला मॅक्ग्राला २ धावांवर बाद केलं. तर राधा यादवने एलिस पेरीला एका धावेवर बाद केलं. दरम्यान, एश गार्डनरने २३ धावांची खेळी केली. ती पूजा वस्त्रकरच्या गोलंदाजीवर बाद झाली. राजेश्वरी गायकवाडने २८ धावा करणाऱ्या बेथ मूनीला बाद केलं. तरपुन्हा एकदा पूजा वस्त्रकरने ग्रेस हॅरीसला बाद करून ऑस्ट्रेलियाला सहावा दणका दिला. राधा यादवने एनाबेल सदरलँडचा त्रिफळा उडवला. तर हीथर ग्राहमला यास्तिका भाटियाकडे झेल देण्यास भाग पाडलं.

ऑस्ट्रेलियाने सलग दोन वर्ल्ड कप जिंकले आहेत. तसंच गेल्या वर्षभरात ऑस्ट्रेलियाने केवळ एकच टी२० सामना गमावला होता. त्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता. दरम्यान, ट्राय सिरीजमध्ये भारताला फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभूत व्हावं लागलं.

First published:

Tags: ICC Women T20 World Cup