मुंबई, 25 जानेवारी : वुमन्स प्रीमियर लीगमध्ये बीसीसीआयने पाच संघांची विक्री केली असून यातून ४६६९.९९ कोटी रुपये कमावले आहेत. बीसीसीआय सचिव जय शहा यांनी ट्विटवरवरून याबाबतची माहिती दिली आहे. तसंच महिलांचे आयपीएल वुमन्स प्रीमियर लीग या नावाने ओळखलं जाईल असंही जय शहा म्हणाले.महिला प्रीमियर लीगमध्ये अहमदाबाद, मुंबई, बंगळुरु, दिल्ली आणि लखनऊचे संघ असणार आहेत.
अहमदाबादचा संघ अडानी स्पोर्ट्सलाइन प्रायव्हेट लिमिटेडने १२८९ कोटी रुपयांना खरेदी केला. तर इंडियाविन स्पोर्ट प्रायव्हेट लिमिटेडने मुंबईचा संघ खरेदी केला. यासाठी कंपनीने ९१२.९९ कोटी रुपये मोजले.
हेही वाचा : मुंबई इंडियन्सच्या फॅमिलीत आणखी एक टीम, WPLमध्ये MIची 'लेडी पलटन'
बीसीसआयचे सचिव जय शहा यांनी ट्विटरवर म्हटलं की, आजचा दिवस क्रिकेटमध्ये एक ऐतिहासिक दिवस आहे. कारण पहिल्या WPLमध्ये संघांच्या बोलीने २००८ मध्ये पुरुषांच्या आयपीएल उद्घाटनाचे विक्रम मोडले आहेत. विजेत्यांचे अभिनंदन कारण आम्हाला या लिलावातून 4669.99 कोटी रुपये मिळाले आहेत.
’ . The combined bid valuation is INR 4669.99 Cr A look at the Five franchises with ownership rights for #WPL pic.twitter.com/ryF7W1BvHH
— BCCI (@BCCI) January 25, 2023
बंगळुरूचा संघ रॉयल चॅलेंजर्स स्पोर्ट्सने ९०१ कोटी रुपयांना घेतला. तर दिल्लीचा संघ जेएसडब्लू जीएमआर क्रिकेटने ८१० कोटी रुपयांना विकत घेतला. कॅप्री ग्लोबल होल्डिंग्जने लखनऊच्या संघासाठी ७५७ कोटी रुपयांची बोली लावली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Cricket