Elec-widget

मुलीला क्रिकेटची बॅट विकत घेऊन देण्यासाठी वडील विकायचे दूध

शिव्या खाल्या, टोमणे ऐकले पण शेवटी क्रिकेटची ‘वाघीण’ झालीच हरमनप्रीत कौर

  • Share this:

आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने आज आम्ही तुम्हाला अशा शूर मुलीची गोष्ट सांगणार आहोत जिने लोकांचे टोमणे, शिव्या सहन केल्या पण स्वतःच्या ध्येयापासून दूर गेली नाही. आज तिला संपूर्ण जग ‘वाघीण’ म्हणून ओळखते. सचिन तेंडुलकरनेही तिच्या खेळाचं भरभरून कौतुक केलं.

आम्ही बोलत आहोत ते भारतीय महिला क्रिकेट टीमची खेळाडू हरमनप्रीत कौरबद्दल. आज हरमनप्रीतचा वाढदिवस. हरमनप्रीतचं पूर्ण नाव रमनप्रीत हरमनप्रीत कौर भुल्लर आहे.

तिचा जन्म जागतिक महिला दिनाच्या दिवशी अर्थात ८ मार्च १९८९ मध्ये पंजाबच्या मोगा येथे झाला. तिचे आई- वडील हरमंदर सिंग भुल्लर आणि सतविंदर कौरने सांगितलं की, हरमनने तिचं सुरुवातीचं शिक्षण भूपिंदरा खालसा गर्ल्स स्कूलमधून आणि १० वी गव्हर्नमेन्ट सीनिअर सेकेंडरी स्कूलमधून केलं.

Loading...

हरमनप्रीत ही एक अष्टपैलू खेळाडू आहे. तिने टी२० वर्ल्ड कपच्या कर्णधार पदाची धुरा सांभाळली आहे. हरमनप्रीत सर्वात आधी तेव्हा चर्चेत आली जेव्हा तिने वर्ल्ड कप २०१७ मध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या सेमीफायनल सामन्यात ११५ चेंडूत १७१ धावा केल्या होत्या.

२० चौकार आणि ७ षटकारांच्या मदतीने तिने १४८.६९ च्या सरासरीने धडाकेबाज खेळी खेळली. हरमनने फक्त महिला क्रिकेटमध्येच नाही तर पुरूष क्रिकेटचेही अनेक रेकॉर्ड्स मोडले आहेत.

हरमन भारतीय टी२० टीमची कर्णधार आहे. हरमनप्रीत ७ मार्च २००९ मध्ये टीम इंडियामध्ये पदार्पण केले. याच दिवशी तिने पाकिस्तानविरुद्ध पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. १३ ऑगस्ट २०१४ मध्ये हरमनने इंग्लंडविरुद्ध कसोटी सामन्यात पदार्पण केलं होतं.

गेल्या वर्षी ऑस्टेलियालिरुद्ध खेळताना भारताने टी२० क्रिकेटमध्ये सर्वात मोठा विजय मिळवला होता. त्या सामन्यात हरमनप्रीतने ३१ चेंडूत ४६ धावा केल्या होत्या. २०१६ मध्ये हरमनप्रीतकडे टी२० संघाचं कर्णधारपद सोपावण्यात आलं.

तीन भावंडांमध्ये सर्वात मोठी हरमनप्रीत शाळेत असताना हॉकी आणि एथलेटिक्स खेळायची. मात्र तिच्या मनात क्रिकेटचं बसलं. तिच्याकडे खेळाचं वातावरणही नव्हतं आणि सुविधा तर त्याहून नव्हती.

वडिलांकडेही मुलीला एक बॅट विकत घेऊन देण्याचे पैसेही नव्हते. ५ वर्षांच्या हरमनप्रीतसाठी ते मोठी बॅट तोडून ती छोटी करून तिला खेळायला द्यायचे. प्रतिकुल परिस्थितीतही हरमनप्रीतचं क्रिकेट प्रेम तसूभरही कमी झालं नाही.

भुल्लर कुटुंब सुरुवातीला छोट्या घरात राहायचे. मुलगी क्रिकेटर झाल्यावर मुलीसाठी मोठं घर घ्यावं असं वडिलांना वाटले. त्यांनी गृहकर्ज घेण्याचं ठरवलं. मात्र हरमनप्रीतने तसं करू दिलं नाही. कुटुंबावर अतिरिक्त आर्थिक ओझं व्हावं अशी तिची इच्छा नव्हती. जेव्हा हरमनप्रीतकडे पैसे आले तेव्हा तिने सर्वातआधी वडिलांसाठी मोठं घर घेतलं.

लहानपणी हरमनप्रीत मुलांसोबत गल्लीत क्रिकेट खेळायची.भाऊ गुरजिंदर आणि त्याच्या मित्रांसोबत ती तासन् तास क्रिकेट खेळायची. हरमनप्रीत हॉकी खेळाडू व्हावी अशी तिच्या वडिलांची इच्छा होती. पण तिचं पहिलं प्रेम अर्थात क्रिकेटच होतं.

हरमनप्रीत कमरेला ओढणी बांधायची आणि हॉकी स्टीकला क्रिकेटची बॅट बनवून शॉट खेळायची. २००६ मध्ये मोगा जिल्ह्यातील तारापुर गावातील ज्योती स्कूलमध्ये शिकायला गेल्यावर तिचं आयुष्य बदललं. या शाळेत क्रिकेट अकादमी होती.

५५ वर्षांचे हरमंदर सिंग भुल्लर मोगा येथे नोकरी करतात. त्यांच्या नोकरीमधून घर खर्च भागतो. मात्र त्यापेक्षा अतिरिक्त पैसे ते खर्च करू शकत नव्हते. हरमनप्रीतला एक बहीण आणि एक भाऊही आहे. त्याकाळात हरमनप्रीतचे वडील मुलीला महागातली बॅट देऊ शकत नव्हते म्हणून त्यांनी घरात ४ म्हशी पाळल्या होत्या. त्याचं दूध विकून ते हरमनप्रीतला स्वस्तातली बॅट विकत घेऊन द्यायचे आणि तिचा अतिरिक्त खर्च करायचे.

हरमंदर स्वतः बास्केटबॉल आणि हँडबॉल या खेळाचे राज्यस्तरीय खेळाडू राहिले आहेत. त्यांनी कधीही मुलगा आणि मुलगीमध्ये फरक केला नाही. ते अनेकदा गुरु नानक स्टेडिअममध्ये हरमनप्रीतचा खेळ पाहायला जायचे. शेजारील त्यांच्यावर हसायचेही. मुलीला खेळाडू करून काय करणार असा प्रश्न ते नेहमी विचारायचे पण हरमंदर यांनी यासर्वाकडे दुर्लक्ष केलं.

पटियाला येथे एकदा हरमन कौरने स्थानिक क्रिकेट सामन्यात ७५ धावांची खेळी खेळली होती. यावेळी तिने आसपासच्या घरातील खिडक्यांच्या काचा फोडल्या होत्या. काही लोक भांडायला मैदानात गेलेही, मात्र हरमनप्रीतचा खेळ पाहून ते तिच्या प्रेमातच पडले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 8, 2019 06:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...