Home /News /sport /

Women's T20 Challenge : लय भारी पोरी! डोक्यावर आपटून अडवला चेंडू, महिला क्रिकेटपटूच्या फिल्डिंगचा VIDEO पाहून व्हाल अवाक

Women's T20 Challenge : लय भारी पोरी! डोक्यावर आपटून अडवला चेंडू, महिला क्रिकेटपटूच्या फिल्डिंगचा VIDEO पाहून व्हाल अवाक

नट्टाकननं सीमारेषेवर जबरदस्त फिल्डिंग करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. नट्टाकनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

    दुबई, 10 नोव्हेंबर : महिला टी-20 चॅलेंजचा (Women's T20 Challenge) अंतिम सामना ट्रेलब्लेझर्स आणि सुपरनोवाज (Trailblazers Vs Supernovas) यांच्यात खेळला गेला. या सामन्यात स्मृति मंधानाच्या (Smriti Mandhana) नेतृत्वाखाली खेळणाऱ्या ट्रेलब्लेझर्स (Trailblazers) नी लागोपाठ तिसऱ्यांदा सुपरनोवाज (Supernovaj) चं महिला टी-20 चॅलेंज जिंकण्याचं स्वप्न मोडलं आहे. ट्रेलब्लेझर्सनी सुपरनोवाजला 16 रननी मात देऊन पहिल्यांदाच महिला आयपीएल फायनलवर आपलं नाव कोरलं. या सामन्यात थायलॅंडची नट्टाकन चनटम (Nattakan Chantam) सर्वात चर्चेचा विषय ठरली. नट्टाकननं सीमारेषेवर जबरदस्त फिल्डिंग करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. नट्टाकनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पहिले फलंदाजी करत ट्रेलब्लेझर्सने कर्णधार स्मृती मंधानाच्या शानदार खेळीमुळे 8 विकेट गमावून 118 धावा केल्या. आव्हान कमी असल्यामुळे संघाची जबाबदारी गोलंदाजीवर होती. मात्र ट्रेलब्लेझर्सनं जबरदस्त गोलंदाजी आणि फिल्डिंग केली. दुसऱ्या डावाच्या दुसऱ्या ओव्हरमध्ये अॅक्लेस्टोनच्या गोलंदाजीवर जेमिमा रॉड्रिक्सने कट शॉट मारला. मागे कोणाताही फिल्डर नव्हता, त्यामुळे हा चौकारच होता. मात्र त्यावेळी अचानक नट्टाकन धावत आली आणि तिने जबरदस्त फिल्डिंग करत चौकार अडवला. वाचा-Women’s IPL : ट्रेलब्लेझर्सनी मोडलं सुपरनोवाजचं स्वप्न, पहिल्यांदा जिंकली ट्रॉफी वाचा-मुलीच्या जन्माने नशीबच बदललं, दोन दिवसांमध्येच भारतीय टीममध्ये निवड ट्रेलब्लेझर्सने या मॅचमध्ये पहिले बॅटिंग करत मजबूत सुरुवात केली. स्मृती मंधाना आणि डिएंट्रा डॉटिन यांच्यात 71 रनची ओपनिंग पार्टनरशीप झाली, पण पूनम यादवने डॉटिनला आऊट केलं. यानंतर ट्रेलब्लेझर्स यांची बॅटिंग गडगडली. मंधानाने 68 रनची खेळी केली, पण सिरिवर्धनेने मंधनाला आऊट करुन ट्रेलब्लेझर्सना 101 रनवर दुसरा धक्का दिला. वाचा-DC vs MI नाही तर मुंबई विरुद्ध मुंबई सामना, खेळणार 'हे' 7 मुंबईकर राधा यादवने घेतल्या 5 विकेट यानंतर कोणत्याही खेळाडूला सुपरनोवाजच्या बॉलिंगपुढे टिकता आलं नाही. ट्रेलब्लेझर्सने 20 ओव्हरमध्ये 118 रनच करता आले. राधा यादवने 5 विकेट घेत 16 रन दिल्या. तर पूनम यादव, शशिकला यांना प्रत्येकी 1-1 विकेट मिळाली. मंधानाने 49 बॉलमध्ये 5 फोर आणि 3 सिक्स मारून 68 रन केले. तर ऋचा घोष 10 रन, दीप्ती शर्मा 9 रन, हरलीन देओल 4 रन सोफी आणि झूलन गोस्वामी यांनी एक-एक रन केली
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या