WPL : मितालीनं सामना गमावला, तरी फायनलमध्ये केला प्रवेश

मिताली राजच्या व्हेलॉसिटीने नेट रन रेटच्या जोरावर अंतिम फेरीतील स्थान पक्कं केलं आहे.

News18 Lokmat | Updated On: May 10, 2019 12:36 PM IST

WPL : मितालीनं सामना गमावला, तरी फायनलमध्ये केला प्रवेश

जयपूर, 10 मे : एकीकडं पुरुषांच्या आयपीएल सामना शेवटच्या टप्प्यात आला असताना रविवारी कोणता संघ बाजी मारेल हे कळणार आहे. दरम्यान दुसरीकडं महिलांच्या आयपीएल स्पर्धेतही सध्या चुरसीशी लढत सुरु आहे. दरम्यान गुरुवारी हरमनप्रीतच्या सुपरनोव्हाज संघानं मितीली राजच्या व्हेलॉसिटी संघाला पराभूत केलं. पण तरीही मिताली राजच्या संघानं फायनलमध्ये धडक मारली आहे.

गुरुवारी या दोन्ही संघात झालेल्या सामन्यात मुंबईकर जेमिमा रॉड्रीग्जनं वादळी खेळी केली. तिच्या या खेळीच्या जोरावर सुपरनोव्हाज संघाने व्हेलॉसिटी संघाविरुद्ध 142 धावा उभ्या केल्या. जेमिमानं नाबाद 77 धावांची तुफानी खेळी केली. मात्र या लक्ष्याचा पाठलाग व्हेलॉसिटी संघाला करता आला नाही. त्यामुळं सुपरनोव्हाजने हा सामना 12 धावांनी जिंकला. मात्र, व्हेलॉसिटीने नेट रन रेटच्या जोरावर अंतिम फेरीतील स्थान पक्कं केलं आहे. तर, स्मृती मानधानाच्या ट्रेलब्लेझर संघाला साखळीतच आपाल गाशा गुंडाळावा लागला.मितीली राजच्या संघानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. सुरुवातीला गोलंदाजांनी सलामीच्या फलंदाजांना लवकर बाद केले. दरम्यान त्यानंतर जेमिमाने दुसऱ्या विकेटसाठी अथापट्टूसह अर्धशतकी भागीदारी केली. अॅमेला केरने ही भागीदारी तोडली. तरी, जेमिमाने एका बाजूने फटकेबाजी सुरू ठेवली होती. तिने 31 चेंडूंत आपले अर्धशतक पूर्ण केले, आणि व्हेलॉसिटी संघाला 142 धावाचे आव्हान दिले. दरम्यान या आव्हानाचा पाठलाग करताना, व्हेलॉसिटी संघाची सुरुवात निराशाजनक झाली. अवघ्या 21 धावांवर दोन्ही सलामीचे फलंदाज बाद झाले. त्यावंतर डॅनियल व्हॅट आणि मिताली राज यांनी अर्धशतकी भागीदारी केली. परंतु त्यांना आपल्या संघाला सावरता आले नाही. मितालीनं 42 चेंडूंत नाबाद 40 धावा केल्या तर कृष्णमूर्तीनं 29 चेंडूत नाबाद 30 धावा केल्या. मात्र व्हेलॉसिटी संघाला सामना गमवावा लागला. दरम्यान अंतिम सामन्यातही मितील विरुद्ध हरमनप्रीत असाच सामना पाहायला मिळणार आहे.

Loading...

वाचा- आयपीएलमुळं भंगलं 'या' खेळाडूचं वर्ल्ड कप खेळण्याचं स्वप्न, पण मुंबई इंडियन्स करणार मदत

वाचा- DC vs CSK : चेन्नईचं पारडं जड, पण धोनीला दिल्लीच्या 'या' युवा खेळाडूंपासून खतरा !

वाचा- IPL 2019 : मुंबई इंडियन्सच्या चाहत्यांना मोठा धक्का, 120 सेकंदात फायनलचं स्वप्न भंगलं


VIDEO: 'प्रियंका गांधींचे वडील रावण', भाजप नेत्याची जहरी टीकाबातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 10, 2019 12:36 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...