S M L

आता सुरू होणार महिलांचं आयपीएल!

महिला आयपीएल लीग भरवण्यासाठी बीसीसीआयनं सकारात्मकता दर्शवलीय. आगामी ३ वर्षांमध्ये महिला आयपीएल सुरू करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे.

Sonali Deshpande | Updated On: May 16, 2018 11:44 AM IST

आता सुरू होणार महिलांचं आयपीएल!

16 मे : महिला आयपीएल लीग भरवण्यासाठी बीसीसीआयनं सकारात्मकता दर्शवलीय. आगामी ३ वर्षांमध्ये महिला आयपीएल सुरू करण्याचा बीसीसीआयचा विचार आहे. बीसीसीआयच्या क्रिकेट प्रशासकीय समितीचे अध्यक्ष विनोद राय यांनी या संदर्भातले संकेत दिले आहेत.

२०१७ साली इंग्लंडमध्ये पार पडलेल्या महिला विश्वचषकात भारतीय महिलांनी अंतिम फेरीत धडक मारली होती. या कामगिरीनंतर भारतात महिला आयपीएल सुरु करण्याच्या मागणीनं जोर धरला होता. यासाठी २२ मे रोजी भारतीय महिला संघ विरुद्ध अन्य महिला संघातील खेळाडूंचा एक प्रदर्शनीय टी-२० सामना आयोजित करण्यात आला आहे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, दक्षिण आफ्रिका या संघातील महिला खेळाडू भारतीय संघाविरुद्ध सामना खेळणार आहेत.

मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार असल्याची माहिती राय यांनी दिली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 16, 2018 11:44 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close