भारतीय महिला हॉकी टीमनं शूटआऊटमध्ये चिलीचा केला पराभव

भारतीय महिला हॉकी टीमनं शूटआऊटमध्ये चिलीचा केला पराभव

भारतीय महिला हॉकी टीमने जागतिक लीगच्या दुसऱ्या टप्प्यात विजेतेपद पटकावलंय.

  • Share this:

11 एप्रिल : भारतीय महिला हॉकी टीमने जागतिक लीगच्या दुसऱ्या टप्प्यात विजेतेपद पटकावलंय.या विजयासोबत भारतीय महिला हॉकी संघाने जागतिक लीगच्या सेमीफायनलमध्ये धडक मारलीय.भारताने रंगतदार अंतिम लढतीत चिलीचा शूटआऊटमध्ये 3-1 असा पराभव केला.

ही मॅच पाहताना अनेकांना शाहरुखच्या चक दे इंडिया चित्रपटाची आठवण झाली.हा अंतिम सामना निर्धारित वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला होता.त्यामुळे शूटआऊटचा निर्णय घेण्यात आला.यात शूटआऊटमध्ये कर्णधार रानी आणि मोनिकानं भारताला 2-0 अशी आघाडी मिळवून दिली.

यावेळी भारताची गोलरक्षक सवितामध्ये चक दे इंडियातील गोलरक्षक विद्याची झलक दिसली.तिनं चिलीच्या गोल करण्याच्या लागोपाठ दोन संधी थोपवून धरल्या.मग दीपिकानं तिसऱ्या प्रयत्नात आणखी एक गोल झळकावून भारताला सामना आणि विजेतेपदही जिंकून दिलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2017 11:31 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...