अखेर सचिनचा 30 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तुटला! महिला क्रिकेटपटूनं केली अजब कामगिरी

अखेर सचिनचा 30 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड तुटला! महिला क्रिकेटपटूनं केली अजब कामगिरी

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारतीय महिला संघाकडून खेळणाऱ्या 15 वर्षीय खेळाडूनं मोडला सचिनचा विक्रम.

  • Share this:

नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : महान फलंदाज मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर याचे जवळ जवळ सर्व रेकॉर्ड तोडण्यात खेळाडू यशस्वी झाले आहे. दरम्यान अजूनही असे काही रेकॉर्ड आहेत, जे फक्त सचिन तेंडुलकरच्या नावावर आहेत. मात्र सचिनचा 30 वर्षांपूर्वीचा एक रेकॉर्ड टीम इंडियाच्या महिला क्रिकेटपटूनं तोडला आहे. दक्षिण आफ्रिका महिला क्रिकेट संघाविरोधात झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय महिली क्रिकेट संघातून युवा खेळाडूनं क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. या युवा खेळाडूचे नाव आहे शेफाली वर्मा (Shafali Verma).

भारताचा महिला क्रिकेट संघ सध्या दक्षिण आफ्रिका विरोधात टी-20 सामना खेळत असताना एका 15 वर्षांच्या खेळाडूनं भारतीय संघात पदार्पण केले. शेफाली ही भारताची पहिली अशी खेळाडू बनली आहे. शेफालीनं वयाच्या 15व्या वर्षी आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे. शेफालीनं पदार्पण करताचा सचिन तेंडुलकरचा 30 वर्षांपूर्वीचा रेकॉर्ड मोडला. 30 वर्षांपूर्वी भारतीय संघात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

वाचा-टीम इंडियात मिळाली नाही जागा म्हणून खेळाडूनं सोडला भारत, 'या' देशानं दिली संधी!

शेफालीनं तोडला सचिनचा विक्रम

शेफाली वर्मानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये वयाच्या 15 वर्ष 239 दिवसांनी पदार्पण केले. याआधी हा रेकॉर्ड सचिन तेंडुलकरच्या नावावर होता. सचिननं आपला पहिला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सामना 16 वर्ष 238 दिवसांचा असताना खेळला होता. आता तब्बल 30 वर्षांची सचिनचा हा रेकॉर्ड तोडण्यात ला आहे. शेफाली आता कमी वयात आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारी पहिली भारतीय खेळाडू झाली आहे.

वाचा-गेल्या 30 आठवड्यात भारत वगळता 6 संघांकडून खेळला ‘हा’ स्टार खेळाडू!

पदार्पणात शेफालीला एकही धावा काढता आली नाही

दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेतील पहिल्या सामन्यात शेफालीनं पदार्पण केले. या सामन्यात शेफाली स्टार खेळाडू स्मृती मांधनासोबत सलामीला मैदानात उतरली. मात्र शेफालीला आपले खाते न उघडता मैदानाबाहेर जावे लागले. आपल्या पहिल्या डावात शेफालीला चौथ्या चेंडूवर आपली विकेट गमवावी लागली.

वाचा-‘धोनी एका दिवसात मोठा झाला नाही, मग पंतवर टीका का?’

VIDEO : पवारांबाबत बोलताना उदयनराजेंना कोसळलं रडू, केली 'ही' घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 24, 2019 08:19 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...