भारताचा हा स्पिनर बनला महिला संघाचा नवा कोच

भारतीय महिला क्रिकेट संघाचे हंगामी प्रशिक्षक रमेश पोवार हे 30 नोव्हेंबरपर्यंत त्याच पदावर कायम राहतील अशी घोषणा बीसीसीआयने मंगळवारी केली.

News18 Lokmat | Updated On: Aug 14, 2018 08:50 PM IST

भारताचा हा स्पिनर बनला महिला संघाचा नवा कोच

मुंबई,ता.14 ऑगस्ट : भारतीय महिला क्रिकेट संघाचे हंगामी प्रशिक्षक रमेश पोवार हे 30 नोव्हेंबरपर्यंत त्याच पदावर कायम राहतील अशी घोषणा बीसीसीआयने मंगळवारी केली. या आधीचे प्रशिक्षक तुषार अरोठे यांनी राजीनामा दिल्यानंतर पोवार यांची हंगामी नियुक्ती करण्यात आली होती. बीसीसीआयच्या या घोषणेमुळे पोवार यांना मुदतवाढ मिळाली आहे.पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली संघ सप्टेंबरमध्ये श्रीलंकेच्या दौऱ्यार जाणार आहे. त्याचबरोबर ऑक्टोबरमध्ये वेस्टइंडीज विरुद्ध दुहेरी मालिका खेळणार आहे. त्यानंतर संघ नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या महिला टी-20 विश्व कपमध्येही खेळणार आहे. आत्तापर्यंत भारतासाठी पोवार यांनी अंतरिम प्रशिक्षक म्हणून 31 एक दिवसीय आणि दोन कसोटी सामने पार केले आहेत. आता यापुढची संघाची धुरा आता त्यांच्या हातात देण्यात आली आहे.

काही महिन्यांपूर्वीच तुषार अरोठे यांनी राजीनामा दिला होता. त्यांनी राजीनामा दिल्यानंतर महिला क्रिकेट संघाची धूरा सांभाळण्यासाठी अनुभवी खेळाडूची गरज होती. त्यामुळे त्यांच्या जागी रमेश पोवार यांना अंतरिम प्रशिक्षक म्हणून नेमण्यात आले होते. रमेश पोवार हा भारतीय संघात ऑफ स्पिनर होता.

हेही पाहा...

VIDEO : वय अवघे 15 वर्ष, बाॅडी पाहा पठ्याची !

VIDEO : सपना चौधरीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल

Loading...

VIDEO : हा आहे जगातला सर्वात ताकदवान माणूस !

VIDEO : 'या' गावात सापांचा सुळसुळाट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 14, 2018 08:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...