VIDEO : 4 चेंडूनंतर टेप घेऊन मैदानात आले ग्राउंड्समॅन, क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं

VIDEO : 4 चेंडूनंतर टेप घेऊन मैदानात आले ग्राउंड्समॅन, क्रिकेटच्या इतिहासात असं पहिल्यांदाच घडलं

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या मैदानात आतापर्यंत अनेकदा सामना थांबवावा लागला. मात्र मैदानावर कधी ग्राउंड्समॅन टेप घेऊन आले नव्हते.

  • Share this:

बार्बाडोस, 19 सप्टेंबर : खेळ कोणताही असो त्यात अनेकदा आतापर्यंत मधेच सामना थांबवल्याचा प्रकार घडला आहे. कधी खेळाडूला दुखापत होते तर कधी कोणी आक्षेप घेतं म्हणून खेळ थांबवला जातो. ऑस्ट्रेलिया आणि विंडीजच्या महिला संघामध्ये सुरू असलेल्या टी20 सामना अचान थांबवावा लागला. बार्बाडोसमध्ये झालेल्या सामन्यात अशी चूक झाली जी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत कधीच झाली नव्हती. यामुळे सामना चार चेंडूनंतर थांबवण्यात आला.

महिला संघाच्या सामन्यात 30 यार्ड ऐवजी 25 यार्डचे वर्तुळ असतं. मात्र केन्सिंग्टन ओव्हलच्या मैदानावर या अंतरात गडबड होती. विंडीजच्या महिला संघाविरुद्ध ऑस्ट्रेलियाची वेगवान गोलंदाज मेगन शूटने चार चेंडू टाकले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाची अष्टपैलू खेळाडू जेस जोनासेनला 25 यार्डच्या अंतरात गडबड असल्याचं जाणवलं. याची माहिती तिनं पंचांना दिली. पंचांनी देखील मैदान पाहिल्यानंतर 25 यार्ड आहे की नाही हे मोजण्यासाठी ग्राउंडसमॅनला मैदानात बोलावलं. ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंची शंक खरी ठरली.

ग्राउंडच्या मापात झालेली चूक सुधारण्यात आली. ऑस्ट्रेलियाने या सामन्यात विंडीजला 20 षटकांत 106 धावांत रोखलं. त्यानंतर 7 चेंडू राखून हा सामना जिंकला. ऑस्ट्रेलियाची कर्णधार मेग लॅनिंगने नाबाद 54 धावा केल्या. तर वेगवान गोलंदाज मेगन शूटने सर्वाधिक 3 विकेट घेतल्या.

सामन्याच्या तिसऱ्या षटकात विंडीजची फलंदाज स्टेसी किंगला एरिन बर्न्सने थेट फेकीवर धावबाद केलं. मात्र, पंचांनी तिला नाबाद ठरवलं. पंचांनी म्हटलं की कोणत्याच खेळाडूनं धावबादचं अपिल केलं नाही. तर ऑस्ट्रेलियाची कर्णधार म्हणाली की, आम्ही अपिल लहान केलं आहे. यानंतर थर्ड अंपायरकडून मदत घेण्यात आली. अखेर विंडीजची फलंदाज धावबाद ठरली.

India vs South Africa : कॅप्टन की सुपरहिरो? विराटचा कॅच पाहून आफ्रिकेला आठवला जॉन्टी ऱ्होड्स , पाहा VIDEO

Loading...

India vs South Africa : कॅच का बदला कॅचसे! मिलर की विराट कोण भारी तुम्हीच ठरवा

विधानसभेआधी शेतकऱ्यांसाठी मोठी घोषणा होण्याची शक्यता?, इतर टॉप 18 बातम्या

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: cricket
First Published: Sep 19, 2019 08:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...