WBBL: अरे ही तर लेडी जडेजा! महिला क्रिकेटपटूनं हवेत उडी मारून घेतला कॅच, VIDEO पाहाच

WBBL: अरे ही तर लेडी जडेजा! महिला क्रिकेटपटूनं हवेत उडी मारून घेतला कॅच, VIDEO पाहाच

सुपरवुमन! महिला क्रिकेटपटूनं घेतलेला जबरदस्त कॅच पाहून जडेजालाही विसराल, पाहा VIDEO.

  • Share this:

सिडनी, 22 नोव्हेंबर : कॅचेस विन द मॅचेस, असे क्रिकेट जगतात म्हटले जाते. एका कॅचमुळे संपूर्ण सामन्याचे स्वरूप बदलते. मात्र एक उत्कृष्ट कॅच पकडण्यासाठी खेळाडूच्या टायमिंगची गरज असते. असाच प्रकार सध्या ऑस्ट्रेलिया सुरू असलेल्या महिला बॅग बॅश लीगमध्ये (WBBL) दिसला. मेलबर्न रेनेगेड्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यात झालेल्या सामन्यात कॉर्टनी वेबनं प्रतिस्पर्धी संघाच्या कर्णधाराचा जबरदस्त कॅच घेतला.

सिडनी सिक्सर्स संघाची कर्णधार एलिस पॅरी 38 चेंडूत 37 धावांवर खेळत होती. चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या पॅरीला बाद करण्यासाठी मेलबर्न रेनेगेड्सच्या गोलंदाज प्रयत्न करत असतानाच कॉर्टनी वेबनं जबरदस्त कॅच घेतला. हा कॅचचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-वडिलांच्या निधनानंतर BCCIने दिली भारतात परतण्याची परवानगी, सिराजनं दिला नकार

या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्सनं सिडनी सिक्सरला 170 धावांचे आव्हान दिले. कॉर्टनी वेबमुळे हे आव्हान 180 पार झाले नाही. वेबनं हवेत उडी मारत चौकार जाणारा चेंडूवर कॅच घेतला.

वाचा-IND vs AUS : कोरोनाचं संकट, तरी भारत-ऑस्ट्रेलिया सीरिज हाऊसफूल!

वाचा-दहशतवादाची भीती, तरी या 3 टीम क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तानला जाणार

वेबनं जबरदस्त कॅच घेतला तरी, मेलबर्न रेनेगेड्सनं दिलेल्या आव्हानाचा पाठलाग सिडनी सिक्सर्सला केवळ 166 पर्यंत मजल मारला आली. त्यामुळे मेलबर्न रेनेगेड्सनं हा सामना 6 विकेटनं जिंकला. या हंगामात कॉर्टनी वेबनं 3 सामने खेळले आहेत. यात तिनं 83.08च्या सरासरीनं 54 धावा केल्या आहेत.

Published by: Priyanka Gawde
First published: November 22, 2020, 12:25 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या