Home /News /sport /

WBBL: एक नंबर! उडी एकीनं मारली, कॅच दुसरीनं घेतला; महिला क्रिकेपटूचा हा VIDEO पाहून व्हाल शॉक

WBBL: एक नंबर! उडी एकीनं मारली, कॅच दुसरीनं घेतला; महिला क्रिकेपटूचा हा VIDEO पाहून व्हाल शॉक

क्रिकेटमध्ये असा कॅच तुम्ही कधीच पाहिला नसेल, विश्वास बसत नसेल तर पाहा हा VIDEO.

    सिडनी, 08 नोव्हेंबर : क्रिकेटमध्ये नेहमी असं म्हटलं जात ही एक उत्तम कॅच मॅच फिरवू शकते. सध्या होत असलेल्या आयपीएलमध्ये (IPL 2020) अनेकदा असे घडल्याचे आपण पाहिले आहे. मात्र महिला क्रिकेटपटूचा असा जबरदस्त कॅच तुम्ही कधीच पाहिला नसेल. सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश लीगमध्ये महिला क्रिकेटपटू ताहलिया मॅकग्रानं असाच एक शानदार कॅच घेत सर्वांना हैराण केले. महिला बिग बॅश लीगच्या 21व्या सामन्यात एडिलेड स्ट्रायकर्सन 8 विकेट गमावत 153 धावा केल्या होत्या. त्यानंतर ब्रिसबेन संघानं 20 ओव्हरमध्ये केवळ 135 धावा केल्या. मात्र या सामन्यात चर्चेचा विषय ठरला तो ताहलियानं घेतलेला जबरदस्त कॅच. ब्रिसबेन हीच संघाकडून एमेरिला केरनं अमांडा वेलिंग्टनच्या चेंडूवर एक शॉट मारला. हवेत चेंडू असताना मॅडी पेनानं उडी मारली मारत तिच्या हातातून चेंडू सटकला आणि मागे उभ्या असलेल्या ताहलियानं हा कॅच घेतला. वाचा-11 नाही फक्त 1 खेळाडू बस्स! हैदराबादच्या 'या' गोलंदाजासमोर कापतो दिल्लीचा संघ वाचा-ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या दोन टेस्ट खेळणार नाही कॅप्टन कोहली! सलामी फलंदाज असलेल्या ताहलियानं या सामन्यात केवळ 10 धावा केल्या. मात्र तिच्या या शानदार कॅचमुळे तिच्या संघानं सामना जिंकला. ताहलिया मॅकग्रानं ऑस्ट्रेलियाकडून आतापर्यंत एक कसोटी आणि 5 एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    Tags: Cricket

    पुढील बातम्या