मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

बोल्ड झाल्यानंतरही अंपायरने दिलं नाही आऊट, कारण ऐकून बसेल धक्का, VIDEO

बोल्ड झाल्यानंतरही अंपायरने दिलं नाही आऊट, कारण ऐकून बसेल धक्का, VIDEO

क्रिकेटचा खेळात बॅट आणि बॉलच्या लढतीमुळे रोमांच वाढतो, पण अनेकवेळा मैदानात आगळ्यावेगळ्या घटना घडतात, ज्यामुळे अनेक जण हैराण होतात. ऑस्ट्रेलियाच्या वूमन्स नॅशनल क्रिकेट लीगमध्येही (WNCL) असाच प्रकार घडला आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 19 डिसेंबर : क्रिकेटचा खेळात बॅट आणि बॉलच्या लढतीमुळे रोमांच वाढतो, पण अनेकवेळा मैदानात आगळ्यावेगळ्या घटना घडतात, ज्यामुळे अनेक जण हैराण होतात. ऑस्ट्रेलियाच्या वूमन्स नॅशनल क्रिकेट लीगमध्येही (WNCL) असाच प्रकार घडला आहे. महिला बॅटर सगळ्यांच्यासमोर बोल्ड झाली, पण अंपायरने तिला आऊट दिलं नाही. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वूमन्स नॅशनल क्रिकेट लीगमध्ये रविवारी टास्मानिया वुमेन टायगर्स आणि क्वीन्सलँड फायर टीम यांच्यात होबार्टमध्ये सामना झाला, याच सामन्यात खेळाडूला बोल्ड होऊनही आऊट देण्यात आलं नाही. टास्मानियाच्या टीमने पहिले बॉलिंग केली. बेलिंडा वाकारेवा इनिंगची 14वी ओव्हर टाकत होती. तिच्या एका बॉलवर क्वीन्सलँडची बॅटर जॉर्जिया वोल बोल्ड झाली. बोल्ड झाल्यानंतर खेळाडू पॅव्हेलियनमध्ये जातो आणि फिल्डिंग टीम जल्लोष करायला लागते, पण या मॅचमध्ये असं काही झालं नाही. बॅटर बोल्ड झाल्यानंतर विकेटकीपर लेग स्लिपच्या दिशेने बॉल उचलण्यासाठी गेली.

View this post on Instagram

A post shared by 7Cricket (@7cricket)

एवढच नाही तर आश्चर्यकारकरित्या बॉलर आणि अंपायरलाही बेल्स पडल्याचं जाणवलं नाही. वोललादेखील बॉल स्टम्पला लागल्याचं कळालं नाही. कॉमेंट्री टीम मात्र रिप्ले बघून हैराण झाली. टास्मानियाला त्यांच्या चुकीची मोठी किंमत चुकवावी लागली नाही. टीमची महत्त्वाची खेळाडू निकोला कॅरीने नाबाद 100 रन केल्यामुळे टास्मानिया हा सामना 5 विकेटने जिंकली.

First published: