भारताच्या नावावर असलेला 'तो' कलंक इंग्लंडने पुसून टाकला!

वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंडचा संघ 77 धावांवर ऑलआउट.

  • Share this:

आयसीसी कसोटी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेला इंग्लंडचा क्रिकेट संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर आहे. या दोन्ही संघात ब्रिजटाऊन येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा संघ 289 धावांवर गुंडाळला. पण या आव्हानाचे पाठलाग करताना इंग्लंडचा संपूर्ण संघ अवघ्या 77 धावांत तंबूत परतला.

वेस्ट इंडिजच्या संघाने दिलेल्या 290 धावांच्या प्रत्युत्तरादाखल खेळताना इंग्लंडच्या संघाने संथ सुरूवात केली. पहिल्या 9 षटकात त्यांनी केवळ 23 धावा काढल्या. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर कुटन जेनिंग्स १७ धावा काढून बाद झाला.

10 व्या षटकानंतर वेस्ट इंडिजच्या घातक गोलंदाजीला सुरूवात झाली. यात केमार रोचने इंग्लंडच्या निम्म्या संघाला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्याने फक्त 17 धावा दिल्या.

इंग्लंडची 1 बाद 23 वरून 7 बाद 49 अशी अवस्था झाली. इंग्लंडने 44 ते 49 या 5 धावांत 5 गडी गमावले. त्यानंतर तळाचे फलंदाजही वेस्ट इंडिजच्या गोलंदाजांसमोर फार काळ टिकाव धरू शकले नाहीत.

वेस्ट इंडिजच्या केमारने 5 तर जेसन होल्डर आणि जोसेफ यांनी प्रत्येकी 2-2 गडी बाद केले. तर शॅनन गॅब्रियलने एक गडी बाद केला. इंग्लंडचे 7 फलंदाज दुहेरी धावसंख्याही गाठू शकले नाहीत.

वेस्ट इंडिजविरुद्ध इंग्लंडची ही आतापर्यंतची सर्वात खराब कामगिरी ठरली आहे. इतकंच नाही ब्रीजटाऊनवर कसोटी इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या ठरली. याआधी भारताच्या नावावर हा विक्रम होता. भारत 81 धावांवर बाद झाला होता.

इंग्लंडची 77 धावांवर सर्वबाद होण्याची ही चौथी वेळ आहे. इंग्लंड यापूर्वी 45 धावावर ऑलआउट झाला होता. ही त्यांची सर्वात निच्चांकी धावसंख्या आहे.

आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात कमी धावांत ऑलआउट होण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या नावावर आहे. घरच्याच मैदानावर इंग्लंडविरुद्ध 26 धावांवर ऑलआउट होण्याची नामुष्की ओढवली होती.

First published: January 25, 2019, 12:53 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading