IPL 2019 : चेन्नईच्या विजयानंतर ‘सुपर क्वीन’चा असा जल्लोष

IPL 2019 : चेन्नईच्या विजयानंतर ‘सुपर क्वीन’चा असा जल्लोष

आयपीएलच्या बाराव्या हंगामात सगल तीन सामने जिंकणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जच्या चमुत सध्या आनंदाचे वातावरण आहे.

  • Share this:

चेन्नई, 1 एप्रिल : आयपीएलच्या बाराव्या हंगामात सगल तीन सामने जिंकणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जच्या चमुत सध्या आनंदाचे वातावरण आहे. दरम्यान चेन्नईच्या या सुपरकिंग्जना चिअरअप करण्यासाठी सुपर क्वीनही मैदानात पोहोचल्या होत्या. या क्विन म्हणजे चेन्नई संघाच्या खेळाडूंच्या अर्धांगिनी.

दरम्यान 31 मार्चला चेन्नई विरुद्ध राजस्थानचा सामना पाहण्यासाठी सुरेश रैना, हरभजन सिंग आणि रविंद्र जडेजा यांच्या पत्नी उपस्थित होत्या. यावेळी त्या तमिळ गाण्यावर थिरकताना दिसल्या.

चेपॉकवर झालेल्या या अटीतटीच्या सामन्यात चेन्नईनं राजस्थानला 8 धावांनी हरवले. याचे सर्व श्रेय कर्णधार महेंद्रसिंग धोनीला जातं. चेपॉकवर राजस्थान विरोधात हल्लाबोल करत धोनीनं चेन्नईला सावरले. आतापर्यंत राजस्थानला एकही सामना जिंकता न आल्यामुळे ते गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहेत. मात्र चेन्नईने आयपीएलच्या १२ व्या हंगामात आपली विजयी परंपरा कायम राखत, घरच्या मैदानावर खेळत अटीतटीच्या सामन्यात राजस्थानचा पराभव केला.अखेरच्या षटकात विजयासाठी १२ धावांची गरज असताना ब्राव्होने राजस्थानच्या प्रयत्नांवर पाणी फिरवत चेन्नईला विजय मिळवून दिला. विशेष म्हणजे घरच्या मैदानावर चेन्नई एकही सामना हरलेली नाही.

rong>VIDEO: 'या नेत्याला ओळखा आणि 101 रुपये मिळवा'

First published: April 1, 2019, 6:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading