Home /News /sport /

'विराटबद्दल सन्मान पण...', हरभजनने सांगितला सध्याचा बेस्ट खेळाडू!

'विराटबद्दल सन्मान पण...', हरभजनने सांगितला सध्याचा बेस्ट खेळाडू!

भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याला सध्याचा त्याचा आवडता बॅटर कोण, असा प्रश्न विचारण्यात आला. हरभजनने मात्र आश्चर्यकारकरित्या विराट कोहलीचं (Virat Kohli)) नाव घेतलं नाही.

    मुंबई, 27 जानेवारी : भारताचा माजी क्रिकेटपटू हरभजन सिंग (Harbhajan Singh) याला सध्याचा त्याचा आवडता बॅटर कोण, असा प्रश्न विचारण्यात आला. हरभजनने मात्र आश्चर्यकारकरित्या विराट कोहलीचं (Virat Kohli)) नाव घेतलं नाही. एका मुलाखतीमध्ये हरभजन सिंगला हा प्रश्न विचारण्यात आला. माझा सध्याचा आवडता बॅटर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि आवडता बॉलर जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) आहे, असं उत्तर हरभजनने दिलं. टी-20 असो, वनडे असो किंवा टेस्ट क्रिकेट, रोहित जेव्हा बॅटिंग करत असतो तेव्हा बघून विश्वास बसत नाही. तो बॅटिंग खूपच सोपी करतो, असं हरभजन स्पोर्ट्स टुडेशी बोलताना म्हणाला. 'विराट कोहली आणि केएल राहुलला (KL Rahul) पूर्ण सन्मान देतो, पण मला वाटतं रोहित शर्मा जागतिक क्रिकेटमधला सर्वोत्तम आहे. विराट आणि केएल दोघंही चांगले खेळाडू आहेत, पण रोहित जेव्हा खेळतो तेव्हा तो वेगळ्याच दर्जाचा दिसतो, त्यामुळे रोहित माझा आवडता बॅटर आहे,' असं वक्तव्य हरभजनने केलं. बॉलिंगमध्ये जसप्रीत बुमराह सगळ्यांपेक्षा वेगळा आहे, मग ते टेस्ट, वनडे किंवा टी-20 क्रिकेट असो. बुमराह सर्वोत्तम बॉलर आहे. हे दोन खेळाडूच माझे सगळ्यात आवडते आहेत, असं हरभजनने सांगितलं. वेस्ट इंडिजविरुद्धच्या (India vs West Indies) वनडे आणि टी-20 सीरिजसाठी रोहित शर्माचं दुखापतीनंतर टीम इंडियात पुनरागमन झालं आहे. तर जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे. रोहित शर्मा दोन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. 6 फेब्रुवारीपासून वेस्ट इंडिजविरुद्धच्या 3 वनडे मॅचच्या सीरिजला सुरूवात होणार आहे. यानंतर दोन्ही टीममध्ये 3 टी-20 मॅच खेळवल्या जातील. भारताची टी-20 टीम रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, इशान किशन, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, व्यंकटेश अय्यर, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, रवी बिष्णोई, अक्षर पटेल, युझवेंद्र चहल, वॉशिंग्टन सुंदर, मोहम्मद सिराज, भुवनेश्वर कुमार, आवेश खान, हर्षल पटेल वनडे टीम रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल, ऋतुराज गायकवाड, शिखर धवन, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, श्रेयस अय्यर, दीपक हुडा, ऋषभ पंत, दीपक चहर, शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आवेश खान
       
    Published by:Shreyas
    First published:

    पुढील बातम्या