मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /83! भारताने World Cup जिंकल्यावर पत्रकाराला खावा लागला होता स्वत:चाच लेख

83! भारताने World Cup जिंकल्यावर पत्रकाराला खावा लागला होता स्वत:चाच लेख

 कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट टीमने (Team India) 1983 साली वर्ल्ड कप (1983 World Cup) जिंकला होती. सर्वांसाठीच तो आश्चर्याचा आणि आनंदाचा क्षण होता. या ऐतिहासिक विजयावर आधारित असलेला, रणवीरसिंह अभिनित '83' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे.

कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट टीमने (Team India) 1983 साली वर्ल्ड कप (1983 World Cup) जिंकला होती. सर्वांसाठीच तो आश्चर्याचा आणि आनंदाचा क्षण होता. या ऐतिहासिक विजयावर आधारित असलेला, रणवीरसिंह अभिनित '83' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे.

कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट टीमने (Team India) 1983 साली वर्ल्ड कप (1983 World Cup) जिंकला होती. सर्वांसाठीच तो आश्चर्याचा आणि आनंदाचा क्षण होता. या ऐतिहासिक विजयावर आधारित असलेला, रणवीरसिंह अभिनित '83' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे.

पुढे वाचा ...

  मुंबई, 28 डिसेंबर : कपिल देव (Kapil Dev) यांच्या नेतृत्वात भारतीय क्रिकेट टीमने (Team India) 1983 साली वर्ल्ड कप (1983 World Cup)  जिंकला होती. सर्वांसाठीच तो आश्चर्याचा आणि आनंदाचा क्षण होता. या ऐतिहासिक विजयावर आधारित असलेला, रणवीरसिंह अभिनित '83' हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे. त्यामुळे त्या विजयाच्या वेळच्या अनेक घटनांच्या आठवणींना पुन्हा उजाळा मिळाला आहे. 'विस्डेन' (Wisden) या क्रिकेटविषयक मासिकाचे तत्कालीन संपादक आणि ब्रिटिश पत्रकार डेव्हिड फ्रिथ (David Frith) यांनी भारतीय टीमविषयी लिहिलेल्या टीकात्मक लेखाची पानं त्यांनी भारताच्या आश्चर्यकारक विजयानंतर खाल्ली होती. DNA मध्ये लिहिलेल्या लेखातून त्यांनी स्वतःच त्या प्रसंगाची आठवण शेअर केली आहे.

  भारत आणि भारतीय क्रिकेटचे आपण पहिल्यापासूनच फॅन होतो, असंही फ्रिथ यांनी स्पष्ट केलं आहे; मात्र 1983च्या आधीच्या वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये भारतीय टीमचं प्रदर्शन चांगलं नव्हतं. त्यामुळे भारताविषयी कठोर शब्द वापरणं भाग पडल्याचं त्यांनी सांगितलं.

  डेव्हिड फ्रिथ यांनी लिहिलं आहे, की '1975च्या वर्ल्ड कपच्या ओपनिंग मॅचमध्ये सुनील गावस्कर (Sunil Gavaskar) यांनी 60 ओव्हर्सच्या मॅचमध्ये नाबाद 36 रन्स केले होते. भारताला दोन क्वालिफाइंग मॅचेसमध्ये हार पत्करावी लागली होती. केवळ इस्ट आफ्रिका संघाविरुद्ध भारताला विजय मिळाला होता. 1979 सालीही टीम इंडियाला तीन क्वालिफाइंग मॅचेसमध्ये हार पत्करावी लागली. टीम इंडियाच्या अशा कामगिरीमुळे ती टीम केवळ टेस्ट टीम बनण्याच्या लायकीची आहे, अशी माझी धारणा झाली होती, म्हणून मी लेखात असं लिहिलं होतं, की जोपर्यंत भारत एकदिवसीय मॅचेससाठी तयार होत नाही, तोपर्यंत त्यांनी भविष्यातल्या वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये सहभागी होऊ नये.'

  'मी जे काही लिहिलं होतं, ते केवळ टीमच्या कामगिरीवर आधारित होतं. त्या वेळची भारतीय टीम वर्ल्ड कप जिंकू शकेल, असा विचार मीच काय, कोणीही करू शकत नव्हतं. म्हणूनच कपिल देवच्या नेतृत्वाखाली भारताने जेव्हा वर्ल्ड कप जिंकला, तेव्हा आनंदासोबतच आश्चर्यही वाटलं होतं,' असं फ्रिथ यांनी लिहिलं आहे.

  'झिम्बाब्वेविरुद्ध कपिल देवने नाबाद 175 रन्सची खेळी करून टीमच्या विजयाचा मार्ग निश्चित केला, तेव्हा भारतीय फॅन्सच्या आशा जागृत झाल्या. त्यानंतर ऑस्ट्रेलियावर मात करून भारतीय टीम सेमी-फायनलला आली, तेव्हा मला जाणीव झाली, की कमजोर मानली जाणारी टीम वर्ल्ड कपची दावेदार म्हणून पुढे आली आहे. तिथे टीम इंडियाने इंग्लंडला नमवलं, तेव्हा कोणाचा विश्वासच बसला नाही. त्यानंतर फायनलवर सर्वांच्या नजरा होत्या. कारण तिथे कपिल देव यांच्या टीमला क्लाइव्ह लॉइड यांच्या टीमशी दोन हात करायचे होते,' असं फ्रिथ यांनी लिहिलं आहे.

  भारताने ज्या प्रकारे वेस्ट इंडिजला नमवून वर्ल्ड कपवर आपलं नाव कोरलं, त्याची कल्पना कुणी केलीच नव्हती, असं फ्रिथ यांनी लिहिलं आहे. त्यानंतर त्यांनी लिहिलं आहे, की 'भारताच्या विजयानंतर मला न्यू जर्सीमधल्या एका भारतीय सद्गृहस्थाचं पत्र मिळालं. त्यांनी मला माझ्या जुन्या लेखाची आठवण करून देऊन त्या लेखाचं कात्रण खाण्याचं आव्हान दिलं. माझ्याकडे कसंही पाहिलं जात असलं, तरी मी खेळाप्रति समर्पित असलेला एक सच्चा पत्रकार आहे. त्यामुळे मला माझ्या विचारांमध्ये सुधारणा करण्यात कोणतीही अडचण नव्हती. म्हणून मी त्या भारतीय चाहत्याचं आव्हान स्वीकारलं. लेख प्रसिद्ध झालेला कागद खाणं आरोग्यासाठी चांगलं नाही, हे मला माहिती होतं; पण मी त्यासाठी तयार झालो. मी लॉर्डस् मैदानाच्या प्रेस बॉक्समध्ये बसलो. एका हातात रेड वाइनचा ग्लास आणि दुसऱ्या हातात माझ्या लेखाची प्रकाशित कॉपी होती. मी हळूहळू त्या लेखाचा कागद खाऊन गिळून टाकला.'

  'मी ते शब्द जणू यासाठीच लिहिले होते, की ते खोटे ठरवण्यासाठी भारतीय टीम जीवतोड मेहनत करील, असं मला नंतर वाटलं,' असंही फ्रिथ यांनी लिहिलं आहे.

  First published:
  top videos