Wisden ने घोषित केली तिन्ही फॉरमॅट खेळणारी बेस्ट टीम, 4 भारतीयांचा समावेश

सध्या खेळत असलेले एकापेक्षा एक दिग्गज क्रिकेटपटू काही क्षणांमध्ये मॅचचं चित्र पालटू शकतात, पण असे खूप कमी खेळाडू आहेत जे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये हे काम करू शकतील. विस्डनने (Wisden) अशाच तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम टीमची घोषणा केली आहे.

सध्या खेळत असलेले एकापेक्षा एक दिग्गज क्रिकेटपटू काही क्षणांमध्ये मॅचचं चित्र पालटू शकतात, पण असे खूप कमी खेळाडू आहेत जे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये हे काम करू शकतील. विस्डनने (Wisden) अशाच तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम टीमची घोषणा केली आहे.

  • Share this:
    मुंबई, 14 जून : सध्या खेळत असलेले एकापेक्षा एक दिग्गज क्रिकेटपटू काही क्षणांमध्ये मॅचचं चित्र पालटू शकतात, पण असे खूप कमी खेळाडू आहेत जे क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये हे काम करू शकतील. विस्डनने (Wisden) अशाच तिन्ही फॉरमॅटमध्ये सर्वोत्तम टीमची घोषणा केली आहे, यामध्ये भारताच्या 4 खेळाडूंना सामील करण्यात आलं आहे, पण आश्चर्यकारक गोष्ट म्हणजे पाकिस्तानचा एकही खेळाडू या टीममध्ये नाही. विस्डनच्या ऑल टाईम प्लेयिंग इलेव्हनमध्ये भारताकडून रोहित शर्मा (Rohit Sharma), विराट कोहली (Virat Kohli) या बॅट्समनचा तर ऑलराऊंडर म्हणून रविंद्र जडेजाचा (Ravindra Jadeja) समावेश करण्यात आला आहे. विस्डनने त्यांच्या या टीममध्ये जसप्रीत बुमराहलाही (Jasprit Bumrah) संधी दिली आहे. विस्डनच्या या यादीत ऑस्ट्रेलियाकडून डेव्हिड वॉर्नरला निवडण्यात आलं आहे. तर न्यूझीलंडकडून ट्रेन्ट बोल्ट आणि केन विलियमसन आहेत. इंग्लंडचे जॉस बटलर, बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चरही या टीममध्ये आहेत. अफगाणिस्तानच्या राशीद खानलाही विस्डनने टीममध्ये घेतलं आहे. तिन्ही फॉरमॅटमध्ये दमदार कामगिरी करणाऱ्या पाकिस्तानच्या बाबर आझमला (Babar Azam) मात्र या टीममध्ये जागा देण्यात आली नाही. विस्डनने या टीमचं कर्णधारपद विराट कोहलीला दिलं आहे. कर्णधार म्हणून विराट कोहलीला एकही आयसीसी स्पर्धा जिंकता आलेली नाही. आता न्यूझीलंडविरुद्ध वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपची फायनल जिंकून हे रेकॉर्ड बदलण्याची संधी त्याला आहे. विस्डनची तिन्ही फॉरमॅटसाठीची टीम डेव्हिड वॉर्नर, रोहित शर्मा, विराट कोहली (कर्णधार), केन विलियमसन, बेन स्टोक्स, जॉस बटलर, रविंद्र जडेजा, राशिद खान, जोफ्रा आर्चर, ट्रेन्ट बोल्ट, जसप्रीत बुमराह
    Published by:Shreyas
    First published: