मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 World Cup नंतर विराटऐवजी रोहित कॅप्टन? जय शाहंचा गुगली

T20 World Cup नंतर विराटऐवजी रोहित कॅप्टन? जय शाहंचा गुगली

टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) विराट कोहली (Virat Kohli) वनडे आणि टी-20 फॉरमॅटचं कर्णधारपद सोडणार असून ही जबाबदारी रोहित शर्माला (Rohit Sharma) दिली जाणार आहे, असं वृत्त सोमवारी प्रसिद्ध झालं होतं.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 14 सप्टेंबर : टी-20 वर्ल्ड कपनंतर (T20 World Cup) विराट कोहली (Virat Kohli) वनडे आणि टी-20 फॉरमॅटचं कर्णधारपद सोडणार असून ही जबाबदारी रोहित शर्माला (Rohit Sharma) दिली जाणार आहे, असं वृत्त सोमवारी प्रसिद्ध झालं होतं. बीसीसीआयचे (BCCI) सचिव जय शाह (Jay Shah) यांनी या वृत्तावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. जोपर्यंत टीम इंडिया मैदानात चांगली कामगिरी करत आहे, तोपर्यंत विराट कोहली टीम इंडियाचा कर्णधार राहील, असं जय शाह यांनी स्पष्ट केलं.

'जोपर्यंत टीम इंडिया मैदानात चांगली कामगिरी करत आहे, तोपर्यंत कर्णधार बदलाचा प्रश्न उपस्थित होत नाही,' अशी प्रतिक्रिया जय शाह यांनी दिली. पण जय शाह यांची ही प्रतिक्रिया म्हणजे गुगली तर नाही ना? टीम इंडियाची कामगिरी चांगली होईपर्यंत म्हणजे नेमकं काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. विराटच्या नेतृत्वात भारताने 2017 चॅम्पियन्स ट्रॉफी फायनल, 2019 चा 50 ओव्हरचा वर्ल्ड कप आणि 2021 वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप फायनल खेळली. या तीनही स्पर्धांमध्ये भारताला ट्रॉफी जिंकता आली नाही. मागच्या 4 वर्षांमधली टीम इंडियाची ही कामगिरी नक्कीच समाधानकारक नाही. या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा विजय झाला तर, विराटच्या कॅप्टन्सीबद्दल उपस्थित होणारे प्रश्न संपतील. पण भारताच्या पदरी पुन्हा निराशा आली, तर मात्र पुन्हा एकदा विराटवर टीकेचा भडीमार होईल.

क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये विराटचं कॅप्टन्सी रेकॉर्ड उत्कृष्ट आहे, पण त्याला अजूनपर्यंत एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाही. जून महिन्यात झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या फायनलमध्ये (WTC Final) न्यूझीलंडने टीम इंडियाचा पराभव केला. याआधी भारताने 2013 साली एमएस धोनीच्या (MS Dhoni) नेतृत्वात चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. आयसीसी स्पर्धांमधला भारताचा तो अखेरचा विजय होता.

2020 साली धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली, यानंतर आता तो या टी-20 वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाचा मेंटर झाला आहे. धोनीच्या अनुभवाचा फायदा घेण्यासाठी त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे.

'एमएस धोनीने मेंटर व्हायची जबाबदारी स्वीकारली. फक्त वर्ल्ड कपसाठीच तो मेंटर असेल. बीसीसीआयची ऑफर त्याने स्वीकारल्याबद्दल त्याचे आभार. धोनी रवी शास्त्रीं आणि सपोर्ट स्टाफ बरोबर काम करेल,' असं जय शाह म्हणाले.

धोनीला मेंटर करण्याबाबत विराट कोहली आणि रवी शास्त्रींसोबत चर्चा करण्यात आली. यासाठी सगळे जण तयार होते, त्यामुळेच धोनीला मेंटर करण्यात आल्याचं जय शाह यांनी सांगितलं.

First published:

Tags: BCCI, Rohit sharma, T20 world cup, Team india, Virat kohli