मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

T20 नंतर वनडे टीमचा कॅप्टन झाल्यामुळे रोहितला मिळणार विराटपेक्षा जास्त पगार?

T20 नंतर वनडे टीमचा कॅप्टन झाल्यामुळे रोहितला मिळणार विराटपेक्षा जास्त पगार?

रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खांद्यावर आता भारतीय क्रिकेट टीमला (Indian Cricket Team) पुढे घेऊन जायची जबाबदारी आहे. मुंबईच्या या स्टार खेळाडूला भारताच्या वनडे आणि टी-20 टीमचा कर्णधार करण्यात आलं आहे.

  • Published by:  Shreyas

मुंबई, 10 डिसेंबर : रोहित शर्माच्या (Rohit Sharma) खांद्यावर आता भारतीय क्रिकेट टीमला (Indian Cricket Team) पुढे घेऊन जायची जबाबदारी आहे. मुंबईच्या या स्टार खेळाडूला भारताच्या वनडे आणि टी-20 टीमचा कर्णधार करण्यात आलं आहे. रोहितने भारतीय टीममध्ये आता विराट कोहलीची (Virat Kohli) जागा घेतली आहे, पण विराट टेस्ट टीमचा कर्णधार म्हणून कायम राहणार आहे. रोहित शर्माला अजिंक्य रहाणेच्याऐवजी (Ajinkya Rahane) टेस्ट टीमचा उपकर्णधार करण्यात आलं आहे. रोहितला टी-20 आणि वनडे टीमचं नेतृत्व मिळाल्यानंतर आता त्याच्या पगारात बदल होणार का? रोहितचा पगार विराटपेक्षा जास्त असणार का? असे प्रश्न अनेकांना पडले आहेत.

विराट कोहली, रोहित शर्मा आणि जसप्रीत बुमराह बीसीसीआयच्या (BCCI) करारबद्ध खेळाडूंमध्ये ग्रेड ए+ मध्ये आहेत. बीसीसीआयच्या करारानुसार ए+ खेळाडूंना वर्षाला 7 कोटी रुपये पगार मिळतो. बीसीसीआय कर्णधाराला वेगळं वेतन देत नाही, त्याचप्रकारे ग्रेड ए, ग्रेड बी, ग्रेड सी खेळाडूंना अनुक्रमे 5 कोटी, 3 कोटी आणि 1 कोटी रुपये मिळतात.

आयपीएल 2022 मध्ये कोहलीपेक्षा रोहित जास्त कमावणार

मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा पुढच्या वर्षाच्या आयपीएलमध्ये (IPL 2022) 15 ऐवजी 16 कोटी रुपये घेणार आहे. आरसीबीने (RCB) विराटला 15 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं आहे. कोहलीच्या पगारात 2 कोटी रुपयांची कमी आली आहे, पहिले तो आयपीएलमध्ये खेळण्यासाठी 17 कोटी रुपये घेत होता.

रोहितने विराटपेक्षा जास्त कमावले

रोहितने आयपीएलमध्ये आतापर्यंत 146.6 कोटी रुपये कमावले आहेत. रोहित आयपीएलमध्ये एमएस धोनीनंतर (MS Dhoni) सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू आहे. धोनी आयपीएलमध्ये 150 कोटी रुपयांपेक्षा जास्त कमावणारा एकमेव खेळाडू आहे. कोहलीने आयपीएलमधून आतापर्यंत 143 कोटी रुपयांची कमाई केली आहे.

रोहित शर्मा आतापर्यंत 6 वेळा आयपीएल जिंकला आहे. 2009 साली त्याने डेक्कन चार्जर्ससोबत आयपीएल ट्रॉफी जिंकली. यानंतर त्याने आपल्या नेतृत्वात मुंबईला 2013, 2015, 2017, 2019 आणि 2020 अशा पाचवेळा आयपीएल चॅम्पियन बनवलं.

First published:

Tags: Rohit sharma, Team india, Virat kohli