पृथ्वी शॉ सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड मोडणार?

पृथ्वी शॉ सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड  मोडणार?

पृथ्वीनं रणजी ट्रॉफीमध्ये आता सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी करण्याइतपत जवळ पोचलाय. आता तो हे सचिनचं रेकॉर्ड मोडतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय

  • Share this:

मुंबई, 02नोव्हेंबर:  पृथ्वी शॉ हा मुंबईचा खेळाडू  आपल्या कामगिरीनं सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय. पृथ्वीनं रणजी ट्रॉफीमध्ये आता सचिनच्या रेकॉर्डची बरोबरी करण्याइतपत जवळ पोचलाय. आता तो  हे सचिनचं रेकॉर्ड मोडतो का याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय

नुकतंच पृथ्वीने एक  शतक झळकावलंय. ओडीसा विरुद्ध सुरु असलेल्या सामन्यात पृथ्वीनं ही कामगिरी केली आहे. पाच सामन्यात पृथ्वीच्या नावावर हे चौथं शतकं आहे. महत्त्वाचं म्हणजे १७ वर्षीय पृथ्वी शॉ, सचिन तेंडुलकरच्या रेकॉर्डच्या जवळ पोहचलाय. १७ वर्षापर्यंत फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतक झळकावण्याचा रेकॉर्ड सचिनच्या नावावर आहे. १८ व्या वर्षांत पदार्पण करण्या आधी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सचिनच्या नावावर ७ शतक होते. तर पृथ्वीच्या नावावर पाच शतक आहेत. पृथ्वीनं रणजी ट्रॉफीच्या पदार्पणातचं शतक झळकावलं होतं. त्यानंतर दुलीप करंडकात पदार्पणातच शतक झळकावणारा तो सर्वांत तरुण बॅट्समन ठरला.

त्यामुळे आता पृथ्वी शॉ सचिनचं रेकॉर्ड तोडतो की नाही याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 2, 2017 10:41 AM IST

ताज्या बातम्या