Home /News /sport /

पत्नी साक्षीने धोनीचं केलं रॅगिंग! लाजून लाल झाला माही, पाहा VIDEO

पत्नी साक्षीने धोनीचं केलं रॅगिंग! लाजून लाल झाला माही, पाहा VIDEO

साक्षीने धोनीचा पाठलाग करून लोकांसमोरच त्याचा गोड छळ केल्याचं व्हिडिओ पाहताना दिसतं.

  नवी दिल्ली, 28 जानेवारी : सध्या क्रिकेट जगतात एकाच गोष्टीची उत्सुकता आहे ती म्हणजे भारताचा दिग्गज क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनी पुनरागमन कधी करणार याची. इंग्लंडमध्ये झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. तो मैदानापासून दूर आहे. तरीही तो नेहमीच चर्चेत राहीला आहे. आता धोनीची पत्नी साक्षीने एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये ती धोनीला ज्या पद्धतीने हाक मारते त्यामुळे तो लाजल्याचं दिसतं. साक्षीने त्याचा पाठलाग करून त्याचा गोड छळ केल्याचंच व्हिडिओ पाहताना दिसतं. दिल्लीतील ताज पॅलेसमध्ये धोनी त्याची एक सुटकेस कर्मचाऱ्याकडे देताना दिसतो. त्यावेळी पत्नी साक्षी त्याला स्वीटी स्वीटी म्हणायला सुरुवात करते. सुरुवातीला धोनी पाठमोरा दिसत असल्याने त्याच्या चेहऱ्यावरचे भाव दिसत नाही. मात्र, दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये धोनी त्याच्या पत्नीजवळ जातो आणि तेव्हा साक्षी पुन्हा त्याला स्वीटी क्युटी म्हणायला सुरुवात केली. यावर धोनी हसतो. ते पाहून साक्षी धोनीला तु लाजत आहेस असं म्हणते.
  View this post on Instagram

  #sweetieoftheday

  A post shared by Sakshi Singh Dhoni (@sakshisingh_r) on

  धोनी वर्ल्ड कपनंतर संघातून बाहे आहे. वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंडविरुद्ध त्याने अखेरचा सामना खेळला होता. त्यानंतर धोनीच्या निवृत्तीची चर्चा केली जात आहे. मात्र, आतापर्यंत धोनीने यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. तज्ज्ञांनी धोनीचे क्रिकेट संपलं असं म्हटलं असलं तरी चाहते मात्र तो पुनरागमन करेल अशी आशा व्यक्त करत आहेत. तो ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी20 वर्ल्ड कपमध्ये खेळेल असंही म्हटलं जात आहे. कॅप्टन कुल धोनीचा हटके अंदाज, साक्षीसोबत केला रोमॅंटिक डान्स! VIDEO VIRAL धोनीने मधल्या काळात भारताच्या लष्करात प्रशिक्षणही घेतलं. त्यानंतर कुटुंबासोबत फिरण्यासाठीही गेला. आता तो आयपीएलची तयारी करत असून रांचीत सराव करत असलेले त्याचे काही फोटोही व्हायरल झाले आहेत. त्याने झारखंडच्या रणजी संघासोबत सराव केला. त्यामुळे आता आयपीएलनंत धोनी टीम इंडियात दिसणार का याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. अनुष्का-विराटच्या कमाईत तीनपट वाढ, दोघं मिळून विकत घेऊ शकतात अनेक देश
  Published by:Suraj Yadav
  First published:

  Tags: Cricket, Team india

  पुढील बातम्या